![]() |
| सह्याद्रीत घुमणारी शिवगर्जना |
राजा शिवछत्रपती पोवाडा: स्वराज्याच्या सिंहगर्जनेची कहाणी
माजले असुर काळाला l त्रासली रयत अत्याचाराला l
त्राता सकलांचा जन्मला l सोळाशे तीस सालाला l
करू मुजरा शिवाजी राजाला ll जी जी ll
जमवून सर्व मावळ्यांना l सांगे हेतू मनातला l
घेतली शपथ रायरेश्वर मंदिरा l घुमली गर्जना सह्याद्रीला l
सज्ज स्वराज्य स्थापनेला ll जी जी ll
शाहिस्ता घाबरून पळाला l मारले अफझल खानाला l
स्मरून गनिमी काव्याला l धाडिले कित्येक नरकाला l
दाविला हिसका औरंग्याला ll जी जी ll
सोळाशे चौऱ्याहत्तर सालाला l राज्याभिषेक होई राजाला l
करी मुजरा पोर्तुगीज टोपीवाला l मिळे राजाधिराज आम्हाला l
सांगू गर्जून साऱ्या जगताला ll जी जी ll
राष्ट्रपती तो व्हिएतनामचा l येई राजधानी दिल्लीला l
राजांची प्रेरणा आम्हाला l लावी कपाळी मातीला l
स्मरून आमच्या राजाला ll जी जी ll

.jpg)
.jpeg)
.jpeg)


0 Comments