Header Ads Widget

दोन जण बुडाले, दोन जण वाचले


दोन जण बुडाले, दोन जण वाचले

कोंडसर बुद्रुकवर शोककळा

आडिवरे - कोंडसर बुद्रुक येथील दोन जणांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातील कोंडसर बुद्रुक येथील चार जण मासेमारीसाठी कौल कारखान्याजवळील खाडीत गेले होते. मासेमारी करत असताना तोल गेल्याने ते खाडात पडले. या चौघांपैकी सुनील केशव घाणेकर (वय ५८) आणि संदीप केशव मोगरकर (वय ४५) यांचा मृत्यू झाला तर तुकाराम शंकर घाणेकर (वय ४२) आणि दीपक केशव मोगरकर (वय ५०) यांना वाचवण्यात यश आले. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. या घटनेची माहिती सागर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अविनाश केदारी आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. 

या दुर्दैवी घटनेमुळे कोंडसर बुद्रुकवाडीवर शोककळा पसरली आहे.


Post a Comment

0 Comments