Header Ads Widget

मुंबईत शिवसेना उबाठाच!


मुंबईत शिवसेना उबाठाच! 

पदवीधर मतदारसंघात अनिल परब विजयी, तर कोकणचा गड भाजपाच्या डावखरेंनी राखला

मुंबई - विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. अनिल पराब यांचा मोठा मताधिक्याने विजय झाल्याची माहिती शिवसनेच्या गोटातून समोर येत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान होते. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.

मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात जास्त नोंदणी केलेल्या उमेदवाराला विजयाची नेहमी संधी असते.

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत झाली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत.

कशी होते मतमोजणी?

पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांमध्ये आधी सर्व मतपत्रिकांची छाननी केली जाते. त्यातील बाद मते बाजूला केल्यावर एकूण वैध मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोटा निश्चित केला जातो. उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळावी लागतात. तेवढा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास दुसऱ्या फेरीची मतांची मोजणी केली जाते. ही प्रक्रिया फारच किचकट असते. एखादा उमेदवार पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास जेवढी पसंतीक्रमाची मते असतात तेवढी सारी मते मोजावी लागतात. तेवढे करूनही उमेदवाराला मतांचा कोटा पूण करता आला नाही तर सर्व मतांची मोजणी होऊन सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो. ही मतमोजणीची प्रक्रिया वेळकाढूपणाची आहे. यामुळे मतमोजणीला बराच वेळ लागतो. source - www.loksatta.com


Post a Comment

0 Comments