Header Ads Widget

santosh pandhare : संतोष पांढरेंचा 'परिवर्तनाचे शिलेदार' पुरस्काराने सन्मान


santosh pandhare : संतोष पांढरेंचा 'परिवर्तनाचे शिलेदार' पुरस्काराने सन्मान 

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवाने घेतली समाजकार्यांची  दखल 

संदीप शेमणकर 

मुंबई - कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा यांच्या वतीने आयोजित बळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत परिवर्तनाचे शिलेदार या पुरस्काराने संतोष पांढरे यांना परिवारासह सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांनी कुणबी युवाचे मनापासून आभार मानले.

गेली १० वर्षे सातत्याने नि:स्वार्थीपणे समाजात करत असलेल्या कामाची ही पोचपावती म्हणून कुणबी युवाकडून पुरस्कार देण्यात आला. या प्रवासात दापोली कुणबी युवक मंडळाचे सर्व सहकारी आणि सयुवक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद खेराडे यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच दापोली शाखेचे अध्यक्ष विजय नायनाक आणि सर्व शाखेचे वरिष्ठ मार्गदर्शक यांचे देखील आभार संतोष पांढरे यांनी मानले.

त्याचप्रमाणे यंग स्टार मित्र मंडळाचा (साकुर्डे - जगदाळेवाडी, ता.दापोली) देखील मनापासून आभारी आहे, त्यांच्यामुळेच मला इथपर्यंत येण्याची मला संधी मिळाली. तसेच ज्या संस्थांच्या माध्यमातून  मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्या शिवसह्याद्री प्रतिष्ठान, युवा फाऊंडेशन, कुणबी युवा प्रतिष्ठान,संवेदना फाऊंडेशन, मायभूमी फाउंडेशन यांचादेखील मनापासून आभारी आहे. यापुढे देखील समाजोन्नती संघाचे काम करत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद,सहकार्य आणि प्रेम असेच कायम राहो असेही संतोष पांढरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments