Header Ads Widget

World Powerlifting Championship 202 : 'पॉवरबाज' सुशांत आगरे, वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण'


मुंबई : श्रीलंकेली कोलंबो येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुशांत सोनू आगरे याने सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. 7 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 12 देशांच्या स्पर्धकांमध्ये 69 किलो वजनी गटात तब्बल 222 किलो वजन उचलून सुशांत आगरे याने सुवर्णमय कामगिरी करत देशासह कोकणाचे नाव उंचावले आहे. 

पैसे हवेत...तर येथे मिळतील

सुशांत आगरे हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील रावारी गावाचा रहिवासी आहे. तसेच भारतीय पॉवरलिफ्टिंग संघाचा कर्णधार आहे. सुशांत आगरे याने खडतर परिस्थितीवर मात करत आणि जिद्दीच्या जोरावर  अतुलनीय कामगिरी करत जगाला आपली ताकद दाखवली. 

सन्मान श्री. पुंडपाळ सरांचा

सुशांतच्या या कामगिरीमागे असलेली मेहनत, धडपड आणि आत्मविश्वास  हेच या यशाचे खरे आधार आहेत. कठीण परिस्थिती आणि  अडचणींवर मात करून सुशांत आगरे याने भारताचे नाव सार्थक केले आहे. 

पैशांची गरज आहे...तर येथे भेट द्या

“जर निर्धार आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येतो.”  हे सुशांत याने दाखवून दिले आहे. त्याच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.  देशभरातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंना सुशांतचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. 

आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला पाहण्यासाठी क्लिक करा

न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा

आडिवरे टाइम्स फेसबुक पेज

व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.










Post a Comment

0 Comments