Header Ads Widget

५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

devendra-fadnavis-cabinet-decision-farmer-loan-waiver-maharashtra-2026
कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यातील ५५ लाख ७२ हजार शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा.


महाराष्ट्राच्या मातीतून या घडीची सर्वात मोठी, सर्वात कडक बातमी! ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजाचा सातबारा कोरा झालाय! मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द, मंत्रिमंडळाकडून थेट शिक्कामोर्तब! 55 लाख शेतकऱ्यांच्या मोठा दिलासा मिळाला आहे. कारण 36 हजार कोटींचं कर्ज आता सरकारने आपल्या डोक्यावर घेतलंय. बळीराजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणारा हा ऐतिहासिक निर्णय नेमका काय आहे? वाचा.

#शेतकरीकर्जमाफी #बळीराजा #फडणवीससरकार #सरकारीयोजना #महाराष्ट्रन्यूज #FarmerLoanWaiver #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #ShetkariKarzmukti2026

मुंबईतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंदोत्सव सुरू झालाय. निमित्त आहे, फडणवीस सरकारचा तो ऐतिहासिक निर्णय, ज्याची वाट राज्यातील लाखो शेतकरी पाहत होते. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ला मंजुरी देण्यात आली.

या योजनेंतर्गत राज्यातील तब्बल 55 लाख 72 हजार शेतकऱ्यांचे 36 हजार 585 कोटी रुपयांचे पीककर्ज थेट माफ होणार आहे. महायुतीने 2024 च्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अखेर पूर्ण केले आहे.


योजनेचे कडक निकष आणि अटी काय आहेत? सोप्या भाषेत समजून घ्या:

कालावधी: ही कर्जमाफी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जाला लागू असेल.

पात्रता: 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज या योजनेसाठी पात्र ठरेल.

मर्यादा: प्रत्येक शेतकऱ्याला कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे.

जमीन धारणा: सर्वात मोठी बाब म्हणजे या योजनेसाठी जमिनीची कोणतीही अट नाही! लहान असो की मोठी, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेल.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना बोनस: ज्यांनी 2023 ते 2026 दरम्यान प्रामाणिकपणे कर्ज फेडले, त्यांना निराश केलेले नाही. त्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट मिळणार आहे.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी: अशा शेतकऱ्यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरण्याची मुदत दिली आहे. ती रक्कम भरताच शासन त्यांचे 2 लाख रुपये जमा करेल.

बँकांचा सहभाग: राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील कर्जांना हा निर्णय लागू असेल.

राजकारणाच्या सारीपाटावर निवडणुका येत-जात राहतील, पण कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या बळीराजाला अशा ठोस सरकारी निर्णयांमुळेच जगण्याची नवी उमेद आणि सन्मान मिळतो.

जाहिरात

मराठी

https://superprofile.bio/vp/the-art-of-headlines-marathi

जाहिरात...शिका हेडलाईन्स

इंग्रजी

https://superprofile.bio/.../the-art-of-powrfull


अटी आणि नियमांच्या चक्रव्यूहात न अडकवता, हा पैसा थेट आणि पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पोहोचणे हीच या योजनेची खरी कसोटी असेल.

खरेदीसाठी येथे क्लिक करा आणि सुंदर आवाज ऐका... https://amzn.to/4ueiUnZ

https://amzn.to/4ueiUnZ


कागदावरचा निर्णय आता बांधावर पोहोचणार

फडणवीस सरकारचा शब्द 

बळीराजाचा सातबारा कोरा करणार!

कर्जमाफीचा निर्णय झालाय, प्रशासकीय हालचाली सुरू झाल्यात. आचारसंहितेच्या कचाट्यातून मार्ग काढत, विधान परिषद निवडणुकीनंतर थेट अंमलबजावणीची घोषणा होईल. पण एक गोष्ट नक्की, या निर्णयाने शेतकऱ्याच्या घरातील विझत आलेली चूल पुन्हा पेटणार आहे. 


माहिती आवडली असेल तर नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आडिवरे टाइम्सला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.

आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला पाहण्यासाठी क्लिक करा

https://www.youtube.com/@adivaretimes8017

शेतकरी कर्जमाफी २०२६, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, देवेंद्र फडणवीस कर्जमाफी, महाराष्ट्र पीककर्ज माफी, नियमित कर्जफेड प्रोत्साहन अनुदान, कर्जमाफीच्या अटी व नियम, ५५ लाख शेतकरी कर्जमाफी, ३६५८५ कोटी कर्जमाफी.


Post a Comment

0 Comments