निसर्गवासी वसंत वारीशेंचे फोटो पूजनाने वर्षश्राद्ध : पुत्र वैभव वारीशेंकडून नवा पायंडा
विशेष प्रतिनिधी
आडिवरे - परिवर्तन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन महत्त्वाचे मानले जाते. मग विज्ञान असो की तंत्रज्ञान, प्रथा असो की परंपरा. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वर्षश्राद्ध या पारंपरिक पद्धतीला फाटा देत परिवर्तनवादी वैभव वारीशे यांनी समाजासमोर नाव पायंडा आणि आदर्श घालून दिला आहे. वैभव वारीशे यांनी वडील वसंत विठ्ठल वारीशे यांचे वर्षश्राद्ध सत्यशोधक पद्धतीने केले. यासाठी काका जोशी यांचे सहकारी गणपत भायाजे यांनी हे कार्य अतिशय समर्पकपणे पार पाडले.
http://loan.gromo.in/sg/dj0j3B0N3j
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील शेडेकरवाडीतील रहिवासी वैभव वारीशे यांनी वडिलांचे वर्षश्राद्ध पारंपरिक पद्धतीने न करता सत्यशोधक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले तसेच परिवर्तनवादींनीही कौतुक केले.
वैभव वारीश यांनी नवीन घर बांधले. या गृहप्रवेशावेळी त्यांनी सत्यनारायण न घालता बळीराजाची पूजा घातली. गणपत भायाजे यांनी बळीराजाची महती सांगत बळीराजाची पूजा केली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
वैभव वारीशे यांनी वर्षश्राद्ध आणि गृहप्रवेश सत्यशोधक पद्धतीने केल्याने त्यांच्या या निर्णयाची चर्चा सुरू आहे. वैभव वारीशे यांनी परिवर्तनाचा मार्ग स्वीकारून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
1 Comments
काळानुरुप योग्य तो बदल झाला पाहिजे आणि तो करण्याचे नैतिक धाडस हवे. वैभव, हार्दिक अभिनंदन
ReplyDelete