SHINDE VS THACKERAY SHIVSENA : धाऊलवल्ली फुटली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
विशेष प्रतिनिधी
आडिवरे - गेल्या अनेक दिवसांपासून कोकणात विशेषत: राजापूर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत. अनेक गावे आणि वाड्यांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेकांनी शिवबंधन सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अवश्य भेट द्या, पैशांची चणचण, नका करू वणवण
देवाचे गोठणे विभागातील धाऊलवल्ली गावातील दळेवाडी आणि भाटलेवाडी येथील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनचे सदस्य किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
0 Comments