KONKAN SHINDE VS THACKERAY : शिंदे - मनसे कार्यकर्त्यांचे 'शिवबंधन'
राजापूर - एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असतानाच कोदवली पंचायत समिती गणातील धोपेश्वर खांबटवाडी येथील शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधणे पसंत केले आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते तसेच राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या उपस्थिती जाहीर प्रवेश केला.
बिझनेससाठी कर्ज पाहिजे, नो टेन्शन , करा क्लिक ........
यावेळी युवासेना उपतालुका युवाधिकारीपदी पुरुषोत्तम खांबल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. प्रवेशकर्त्यामध्ये मनसेचे जिल्हा संघटक पुरुषोत्तम खांबल, अमोल सोगम, मुकेश सोगम, वाडीप्रमुख सुभाष खांबल, एकनाथ खांबल, पांडुरंग खांबल, परशुराम खांबल, चंद्रकांत खांबल, रवींद्र खांबल, अनंत खांबल, बाळकृष्ण खांबल, रमेश खांबल, करू खांबल, विठोबा खांबल, दीपक खांबल, सदाशिव खांबल, कृष्णा खांबल, दशरथ खांबल, वसंत खांबल, मनोहर खांबल आणि महिलावर्गासह अनेकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कॉलेज युनिट निरीक्षक (महाराष्ट्र राज्य) अथर्व राजन साळवी, विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, तालुका महिला आघाडी प्राची शिर्के, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, सभापती सुभाष गुरव, तालुका युवाधिकारी सुरेश ऐणारकर, ओगले, दादा सोगम आणि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments