Header Ads Widget

nilesh sambare : निलेश सांबरेंच्या जनसेवेची वारी


निलेश सांबरे यांच्या जनसेवेची वारी

करियर मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्य वाटप 

- संदीप शेमणकर

राजापूर - बा.ल. साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय देवाचे गोठणे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व मोफत वह्यावाटप करण्यात आले. जिजाऊ संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. महेंद्र मांडवकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. तसेच मुलांना करियरबाबत मार्गदर्शन योग्य वेळी आणि योग्य प्रकारे जर मिळाले तर कोकणातील ग्रामीण भागातूनदेखील प्रशासकीय अधिकारी घडतील हा विश्वास त्यांनी वेळी व्यक्त केला. जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राबवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पैशांची गरज आहे टेन्शन सोडा

जिजाऊचे प्रकल्प संचालक संदीप पाटील यांनी गावातील उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना अपारंपारिक व विविध करियरच्या संधींबाबत जागृत केले. शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षा, दहावी व बारावी नंतर काय? MPSC / SSC / बँकिंग आणि कॉलेज ऑफ मिलेटरी इंजिनिअरिंग /NDA/SPI/TISC अशा अनेक संधीची सविस्तर माहिती दिली आणि त्यांनंतर उपस्थित विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 

लोन सहज उपलब्ध

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयेश जोशी यांनी १२ वी नंतर गावातील मुलांचा कल हा नालासोपारा, विरार, दिवा, ठाणे इकडे जाऊन छोटी मोठी नोकरी करणे हा असतो. अशा संकुचित वृत्तीवर टिप्पणी करत मुलांना स्पर्धा परीक्षा अथवा व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत त्यांच्या गावी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. अशा या प्रकारच्या कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन केल्याबद्दल विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी विभागाचे कायदेशीर सल्लागार ॲड. महेंद्र मांडवकर, जिजाऊचे प्रकल्प संचालक संदीप पाटील, जिजाऊ संस्थेचे सदस्य साहिल गोरे, अमेय गोणबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयेश जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य महाले, सहशिक्षिका आपटे, श्रीमती सावंत , श्रीमती बाणे, श्रीमती शिंदे, कालेकर, शिक्षकेतर कर्मचारी अनंत सोडये, सुनील गोसावी तसेच विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.

लोन कसं मिळणार ?

Post a Comment

0 Comments