Header Ads Widget

aditya thackeray v/s devendra fadanvis : 'महाराष्ट्राचा पप्पू' कोण?


देशाच्या राजकारणात भाजपा नेते हे राहुल गांधी यांना पप्पूची उपमा देतात. आता महाराष्ट्रातील एका नेत्याला 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये असा सल्ला देत निशाणा साधलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पप्पू’चा मुद्दा गाजायला लागलाय. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. राहुल गांधींसारखी स्टाईल मारली तरी त्याचा परिणाम शून्य आहे, असा पलटवारही त्यांनी केलाय. मतदार याद्यांमधील घोळ मांडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला, पण आता फडणवीसांनी त्यांच्याच शैलीत आदित्य ठाकरे यांना उत्तर दिलंय.

मुंबईतील पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यांतील गोंधळाचा मुद्दा मोठ्या स्क्रीनवर सादर केला. राज्यात मतचोरी सुरू आहे, हजारो नावं बोगस आहेत असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, पण या प्रेझेंटेशनची स्टाईलच चर्चेची ठरली... ती म्हणजे मोठी स्क्रीन, हातवारे, मागे चालत बोलणं... अगदी राहुल गांधींच्या शैलीप्रमाणे! आणि इथंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘राजकीय पंच’ मारला. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. मी त्यांना पप्पू म्हणत नाही, पण त्यांनी राहुल गांधींसारखं वागू नये, असं फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या जखमेवरच मीठ चोळलं. आणि त्यांचा संदर्भ स्पष्ट होता. राहुल गांधींनी अनेकदा मोठं सादरीकरण केलं, पण निष्कर्ष मात्र ‘खोदा पहाड, निकला चुहाअसाचा होता. यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आदित्य यांनी तेच केलं” असं म्हणत बोचरी टीका केली.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा शब्दबाण व्यंग नव्हे तर ती एक राजकीय खेळी आहे. ठाकरे गटाचे तरुण नेते म्हणून बाजू मांडणाऱ्या आदित्य ठाकरेंना थेट ‘पप्पूटॅग लावून त्यांची विश्वासार्हता कमी करण्याचा हा डावपेच असू शकतो. मुख्य म्हणजे  मुख्यमंत्र्‍यांनी हे वक्तव्य केलंय ते स्थानिक निवडणूकपूर्वीच्या संवेदनशील काळात. त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांनी टीका करताना अचूक टाईम साधलाय.

आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की, मुंबईतील वार्डांमध्ये मृत मतदार, डुप्लिकेट नावं आणि फेक रेकॉर्ड्स आहेत आणि ही मतांची चोरी आहे. पण निवडणूक आयोगाने याआधीच या आरोपांवर स्पष्टीकरण दिल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. त्यामुळे फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर ड्रामेबाजी’चा आरोप केला.

शेलारांचा निणाशा

फडणवीसांची टिप्पणी ही निव्वळ शब्दयुद्ध नाही, तर मनोवैज्ञानिक डावपेच आहे. राहुल गांधींनापप्पूम्हटलं गेलं आणि त्याचा राजकीय परिणाम दिसला. आता तेच टॅग महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंसाठी वापरणं भाजपच स्ट्रॅटेज असू शकते, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे .

आता हा वाद मनपा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबेल असं वाटत नाही. ‘पप्पू’ हा शब्द एक राजकीय हत्यार बनलाय आणि नवं टार्गेट आहे आदित्य ठाकरे. हा टॅग आदित्य यांची इमेज खराब करेल की त्यांना ‘युवा बळीचा बकरा’ बनवेल? हा प्रश्न निर्माण झालाय.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका वाक्याने महाराष्ट्रात चर्चेचा नवा विषय पेटलाय. राजकीय समीकरणं बदलतायत आणि संवादाचा सूर अधिक आक्रमक होत चाललाय. या सर्व पार्श्वभूमीवर पप्पू” हा शब्द फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहिलेला नाही... तो आता महाराष्ट्राच्या राजकारणातही घुमतोय.

“राहुल गांधींसारखी स्टाईल, पण महाराष्ट्रात त्याचं राजकीय नुकसान कोणाचं होणार? आदित्य ठाकरेंचं की भाजपाचंफडणवीसांचपप्पूही टीका हा केवळ शब्दप्रयोग नाही, तर तो एक संदेश आहे. महाराष्ट्रातील निवडणूक लढाई आता वैचारिक नव्हे, प्रतिमेच्या पातळीवर गेलीय. त्यामुळे आदित्य ठाकरे काय उत्तर देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Post a Comment

0 Comments