![]() | |
कोल्हापुरी बोलीभाषेचा डंका; पुंडपाळ यांच्या 'पावणेर' कथेचा राज्यस्तरीय गौरव
उत्तूरः येथील ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ यांच्या ग्रामीण बोलीभाषेतील ‘पावणेर’ कथेला ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार पुरस्कार मिळाला असून तो राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्री. म. तथा राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या भोर शाखेमार्फत महाराष्ट्रातील विविध ग्रामीण बोलीभाषांतील कथास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत उत्तूर येथील ज्येष्ठ साहित्यिक सदनंद पुंडपाळ यांनी ग्रामीण कृषिसंस्कृतीतील सहकाराचा एक आदर्श नमूना असलेल्या पध्दतीवर कोल्हापुरी ग्रामीण बोलीभाषेत ‘पावणेर’ नावाची कथा पाठवली होती. या कथेला ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या नावचा पुरस्कार जाहीर झाला होता, तो भौर येथील श्रीमंत सौ. गंगुताईसाहेब पंतसचिव वाचनालयाच्या सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब आण्णा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्री. म. तथा राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री. पुंडपाळ यांची कथा, कविता, कादंबरी, विडंबन कविता, चरित्र, दोहे, अभंग अशा विविध प्रकारची एकोणतीस पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना सुमारे वीस राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील, उपाध्यक्ष सुरेश शेटे, कार्याध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, प्रमुख कार्यवाह गिरिश भुतकर, डॉ. संगीता खोकले, उमेश देशमुख आणि प्रा. धनंजय लंबाते हे पदाधिकारी आणि भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांतील अनेक साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल श्री. पुंडपाळ यांचे त्यांचे चाहते आणि विविध व्यक्तींनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्या दिल्या आहेत.
बातमी आवडली तरी लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा. नियमित आडिवरे टाइम्स वाचत राहा
सदानंद पुंडपाळ, द. मा. मिरासदार पुरस्कार, पावणेर कथा, कोल्हापुरी बोलीभाषा, राजा दीक्षित, महाराष्ट्र साहित्य परिषद भोर, ग्रामीण साहित्य, उत्तूर न्यूज.
#SadanandPundpal #LiteratureAward #MarathiSahitya #MirasdarPuraskar #KolhapuriBoli #UtturNews #MarathiBhasha #MaharashtraSahityaParishad

0 Comments