कै. मिनाताई ठाकरे विद्यालय साडवलीचा पार्थ ब्रीद बोर्डात पहिला
कोकण बोर्डात प्रथम क्रमांक पटकाविणारा जिल्हातील पहिला विद्यार्थी ठरला
देवरुख - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ केतन ब्रीद याने १००% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. पार्थने राज्यात कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावत शाळेसह तालुक्याचे नाव चमकवले.
कै. मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवलीचा सलग अठराव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. प्रथम क्रमांक प्राप्त कु. पार्थ केतन ब्रीद याने १००% गुण मिळवून कोकण बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकावला त्याचे वडील केतन ब्रीद हे याच विद्यालयात शिक्षक आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थी
१.कु.पार्थ केतन ब्रीद
२. कु. मधुरा मंदार मांगले
३. कु. नुपूर दिनेश भुरवणे
४. कु. दया संदीप पवार
५. कु. स्वानंद संजय नटे
विद्यालयाने सलग अठराव्या वर्षी १००% निकालाची परंपरा राखली असून एकूण ६२ विद्यार्थ्यापैकी १६ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले व ३५ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उतीर्ण झाले.तसेच ११ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक गणेश जोशी. जितेंद्र यादव, विशाखा सोमण मीना कोळपे. अनंत गिड्ये, केतन ब्रीद,निलेश भुरवणे, समीर यादव यांचे संस्थाध्यक्ष रवींद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे व कार्याध्यक्षा नेहा माने , संस्था पदाधिकारी, स्था.सल्लागार समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक तसेच मुख्याध्यापक बी. व्ही. नलावडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोकण बोर्डात प्रथम क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केलेबद्दल पार्थचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments