Ravindra Chavan : 'भावनिक आवाहनाला बळी पडू नका'
रवींद्र चव्हाण यांचे मतदारांना आवाहन
कोकणातील विकासकामांसाठी सुमारे साडेपाच हजार कोटीचा निधी
महायुतीचे उमेदवार किरण सामंतांच्या प्रचारासाठी महायुतीचा मेळावा
संदीप शेमणकर
राजापूर - महायुतीच्या सत्ता काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली. अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचल्या. लाडकी बहीण योजना असेल किसान सन्मान योजना असेल किंवा अन्य योजना असतील, थेट जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत. कोकणातील विकासकामांसाठी सुमारे साडेपाच हजार कोटीचा निधी दिला. त्यामुळे कुणी भावनिक आवाहन करत असतील तर बळी पडू नका, असे आवाहनही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
अवश्य भेट द्या, मनपसंत खरेदी करा
जिल्ह्यात सगळीकडे विकासकामे होत असतानाच विकासाच्या दृष्टिकोनातून राजापूर विधानसभा मतदारसंघ मागे पडला असून येथे चांगला उमेदवार असावा या प्रतीक्षेत होतो. तसा उमेदवार किरण सामंत यांच्या रूपात लाभला आहे. येथील सुज्ञ मतदार त्यांना विजयी करून विधानसभेत पाठवतील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी ओणी येथे महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
अवश्य भेट द्या, मनपसंत खरेदी करा
ओणी येथील गजानन मंगल कार्यालयात गुरुवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या सत्ता काळात मार्गी लागलेल्या विविध योजनांचा आणि विकासकामांचा आढावा सादर केला. त्याच वेळी विरोधकांचा खरपूस समाचारदेखील घेतला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट ) जिल्हाध्यक्ष बंटी वणजू, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन देसाई, अतुल काळसेकर यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य भेट द्या, मनपसंत खरेदी करा
कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीत ते मतदारांनी सिद्ध केले आहे. या विधानसभा निवडणुकीतही कोकणातील मतदार महायुतीच्या पाठीशी पुन्हा एकदा ठामपणे उभा राहील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. महायुतीच्या सत्ता काळात आम्ही अनेक निर्णय घेतले. योजना आणल्या आणि यशस्वीपणे राबविल्या. आणलेल्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचल्या. लाडकी बहीण योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, प्रत्येक योजना लोकाभिमुख ठरली. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला. शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी आणला आणि त्यातून विकासकामे मार्गी लागल्याचे चव्हाण म्हणाले.
एक्ट्रा इन्कम हवं आहे तर भेट द्या
आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातू साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनसह विकासकामे मार्गी लागल्याचे ते म्हणाले. मात्र राजापूर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून मागे पडला होता. त्याला आता विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर चांगल्या उमेदवाराची प्रतीक्षा होती. किरण सामंत यांच्या रूपाने आम्हाला चांगला उमेदवार मिळाला आहे. महायुतीचे कार्यकर्ते किरण सामंत यांचा जोमाने प्रचार करतील आणि त्यांना विजयी करतील, असा आशावाद चव्हाण यांनी व्यक्त केला. उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सूचना दिल्या. शासनाच्या योजना मतदारांपर्यंत न्या, असे सांगताना प्रत्येक बूथवर ७० टक्के मतदान मिळाले पाहिजे तसे नियोजन करा, असे आवाहन त्यांनी केले. पुढील काही दिवस महत्वाचे असून विरोधक भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न करतील. दिशाभूल करतील त्याला बळी पडू नका असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले.
महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या खास प्रचारासाठी ठाण्यावरून आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'मागील सव्वा दोन वर्षात आम्ही केलेली विकासकामे असतील किंवा यशस्वी राबविलेल्या योजना असतील. त्या आम्ही सांगतो. तुम्ही अडीज वर्षात काय केलेत ते समोर येऊन सांगा, असे आव्हान श्रीकांत शिंदे यांनी केले. अडीज वर्षाच्या सत्ता काळात ज्यांनी स्वतःसह राज्याला बंद केले होते, असा खोचक टोला त्यांनी लगावला. केंद्रासह राज्यात डबल इंजीनचे सरकार आहे. राज्यात एक लाख सतरा हजार कोटींची गुंतवणूक आली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. कोकणात पर्यावरण पूरक असे प्रकल्प आले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नाणार येथील रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाला ज्यांनी मुख्यमंत्री असताना बारसू गावात आणला त्या बारसूत तो प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आणि जागा सुचविली तेच आता रिफायनरीविरोधात भूमिका घेत असल्याची जोरदार टीका सामंत यांनी केली. मागील पंधरा वर्षात राजापूरचा विकास झालेला नाही. मात्र येथील विकासकामे मार्गी लागावीत म्हणून महायुतीचे उमेदवार किरण सामंत सातत्याने प्रयत्न केले. महामार्गावरील वाटूळ येथील मंजूर झालेले मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल किंवा लांजा रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात होणारे रूपांतर असेल हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किरण सामंत यांचा मोठा वाटा आहे, अशा शब्दात त्यांनी किरण सामंत यांचे कौतुक केले. या मतदारसंघात सकारात्मक काम करणारा लोकप्रतिनिधी हवा असून किरण सामंत हे आमदार म्हणून निवडून येतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
कर्जाची गरज आहे, मग येथे भेट द्या
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. किरण सामंत यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार यांचेही गुवाहाटीचे तिकीट काढलेले होते. तापी गाडीत बसता बसता ते थांबले, असा आरोप माने यांनी कुणाचे नाव न घेता केला. मात्र त्यांचा रोख कोणाकडे होता ते उपस्थितांच्या लक्षात आले आणि सभागृहात खसखस पिकली. महायुतीच्या शासनाने यशस्वी राबवलेली लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरेल आणि राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता येईल, असे खासदार धैर्यशील माने यांनी ठासून सांगितले.
0 Comments