Header Ads Widget

HELP FOR STUDENT : विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 'मुक्काम पोस्ट शाळा


 HELP FOR STUDENT : विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 'मुक्काम पोस्ट शाळा

अनाथ आणि ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी 'मुक्काम पोस्ट शाळा' या नाटकाचा मुंबईत प्रयोग 

संदीप शेमणकर 

मुंबई - गुहागर तालुक्यातील अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी "मुक्काम पोस्ट शाळा" या दोन अंकी नाटकाचा विशेष प्रयोग रविवार  १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता साहित्य संघ, गिरगाव, चर्नी रोड, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 

लेट्स खरेदी करायची आहे, मग भेट द्या आणि खरेदी करा

कला संगम आणि दिलीप डिंगणकर आयोजित, शालेय जीवनावरील दोन अंकी नाटक “मुक्काम पोस्ट शाळा” या नाटकाचे सादरकर्ते कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ  आणि गुहागर येथील उमराठ गावचे मंगेश गावणंग लिखित, विनोदी तसेच समाज प्रबोधनपर दोन अंकी नाटक "मुक्काम पोस्ट शाळा" या नाटकामधून आपल्या मराठी शाळेतील आठवणी जाग्या तर होणार आहेत. शिवाय काही गमतीदार किस्से, सामाजिक संदेश तसेच काही मनाला चटका लावणारे प्रसंग पाहायला मिळणार आहेत. 


सदर नाट्यप्रयोगातून मिळणारे उत्पन्न, अनाथ आणि ग्रामीण शाळा, हॉस्टेलमधील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी करणार  असल्याचे आयोजक दिलीप डिंगणकर, कला संगमचे वैभव धनावडे, योगेश गावणंग , मनोज गावणंग यांनी सांगितले आहे. सदर नाटकाच्या मुंबईमधील पहिल्या प्रयोगाला रसिकांचा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. 

हे नाटक नाट्य रसिकांनी आवर्जून पहावे अधिक माहितीसाठी 

९७६६४९२५५, ९८२०२५३५४९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

Post a Comment

0 Comments