पावस बसस्थानकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात
रत्नागिरी : रत्नागिरी-राजापूर राज्य महामार्गावर पावस हे अतिशय महत्त्वाचे बसस्थानक आहे. या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी एमआयडीसीअंतर्गत ९९ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे पावस बसस्थानकाचे रूपडे पालटणार आहे. पावस बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नूतनीकरणानंतर प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
0 Comments