Header Ads Widget

कोकणात उकाडा, तब्येत सांभाळा


कोकणात उकाडा, तब्येत सांभाळा

राजापूर - कोकण किनारपट्टी भागासह इतरत्र पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोकणवासीयांना पाऊस केव्हा पडणार याची प्रतीक्षा लागली आहे. 

गेल्या आठवड्यात  जोरदार अवकाळी पाऊस पडला. काही भागात वादळी पावसामुळे पडझडही झाली. मात्र, त्यानंतर केवळ मळभ दाटून आले. या कालावधीत पूर्वमोसमी पावसाने मात्र पाठ फिरविली. हलक्या सरी पडल्याने वातावरणातील उकाडा वाढला.  गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्याचा पारा वाढलेला आहे.  पूर्वमोसमी पावसाच्या सरी झाल्यास उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र गुरूवारी हलक्या सरींचा पडल्या. शुक्रवारी मळभ दाटून आले होते. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.  

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणवासीयांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान येत्या दोन दिवासात मोसमी पाऊस अरबी सागरात सक्रिय होण्याच्या शक्यतेने पूर्वमोसमी पावसालाही किनारपट्टी भागात अनुकूलता तयार झाली असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. 

Post a Comment

0 Comments