राजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.४८ टक्के
निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्येची विद्यार्थिनी दिव्यश्री पवार ९८.४० टक्के मिळवत तालुक्यात प्रथम
- संदीप शेमणकर
राजापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये राजापूर तालुक्याचा निकाल ९८. ४८ टक्के लागला. या वर्षी संपूर्ण तालुक्यातून १६५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४०६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. तालुक्यातील ७१२ विद्यार्थी प्रथम तर ४३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 36 माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. कोंडये हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्यश्री पवार हिने ९८. ४० टक्के गुण मिळवून संपूर्ण तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान पटकवला. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील धवल यशाची परंपरा तालुक्याने कायम राखली.
तालुक्यातील निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडयेचा निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयातून दिव्यश्री पवार हिला ९८. ४० गुण मिळवून प्रथम क्रमांक, कौमुदी तावडे ८७. ६० द्वितीय तर दीक्षा कांबळे ही ८६. ४० तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली
इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयातून रिया नलावडे ८९. २० टक्के, ईश्वरी मांडवे ८९.२० टक्के संयुक्त प्रथम क्रमांक शिवानी सावंत ८८.६० द्वितीय, निराग मालपेकर ८८.२० टक्के तृतीय आला तर
तालुक्यातील जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचा निकाल ९५ टक्के लागला. या विद्यालयातू मिहिर कोलते हा ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला तर वैष्णवी शेटेही ९०.६० टक्के द्वितीय आणि मधुरा शेटे हिला ८७. ४० टक्के मिळाले.
सरस्वती विद्यामंदिर पाचलचा निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयातून आर्या किंजलस्कर ९६ टक्के आणि सादअली मुसाअली पिरजादे ९६ यांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकवला. तर श्रावणी लाड ही ९५.८० टक्के द्वितीय आणि प्रियदर्शिनी पांगरीकर ९४.८० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
राजापूर हायस्कूलचा निकाल ९७.९३ टक्के लागला. यामध्ये कुमारी श्रेया सावंत ९५.८० टक्के प्रथम क्रमांक कुमारी मानसी झिंबरे ९५ टक्के द्वितीय आणि अनुष्का पेंडखलकर ९२.६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले.
नवजीवन हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये कुमारी आयेशा इसफ हिने ८०.४० गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. तर कुमारी उजमा काझी ७७.८० टक्के द्वितीय तर तनिष बारगीर ७६.८० टक्के आणि अतीक मुजावर ७६.८० तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
माध्यमिक विद्यालय गोठणे दोनिवडे हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये कुमारी पायल हातणकर हिने ८७. ८० % गुण मिळवून प्रथम, कुमार मयूरेश लोळगे याने ८२. ४० द्वितीय आणि कुमार रुशांक बोल्ये ८०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
बज्मे उर्दू अदब संचलित नॅशनल इंग्लिश स्कूल अँड ए.ई. कालसेकर ज्युनिअर कॉलेज रानतळे राजापूर या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयातून तहिरा फातिमा वसीम बंडारकर ९६.८० टक्के प्रथम
साबि्हंमाझं वाजहुलकमर खान ९३.०४ टक्के द्वितीय आणि फैझान फातिमा अझीम चौघुले ९३.२० टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून त्यात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रथम कु. आयेशा रशीद तांबोळी ९२.४० %, द्वितीय कु. तनुजा संभाजी घोरपडे-८९.८०%, तृतीय कु. स्नेहा शांताराम गुरव - ८९.६० टक्के मिळाले आहेत.
कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतील मनश्री मिलिंद कडवईकर हिने ९३.४०% घेत प्रथम क्रमांक पटकावला. मधुरा राम रेडीज हिने ९२.८० % प्राप्त करत द्वितीय तर दीप्ती शेषेराव अवघडे हिने ८८.२० % गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
0 Comments