Header Ads Widget

rotary club ratnagiri : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा पदग्रहण सोहळा


rotary club ratnagiri :  रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा पदग्रहण सोहळा 

संदीप शेमणकर

रत्नागिरी - शनिवार २२ जून रोजी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष आणि सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांचा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे माजी गव्हर्नर रोटे. संदीप अगरवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी अध्यक्षपदी रत्नागिरीतील युवा उद्योजक रुपेश पेडणेकर यांची तर सचिवपदी अ‍ॅड. मनीष नलावडे आणि खजिनदारपदी माधुरी कळंबटे यांची नियुक्ती करण्यात आली. 

नवनिर्वाचित अध्यक्ष रुपेश पेडणेकर यांना मानाची कॉलर प्रदान करून त्यांना अध्यक्षपदाची, अ‍ॅड. मनीष नलावडे यांना सेक्रेटरी पदाची तर माधुरी कळंबटे यांना खजिनदारपदाची सन्मानाची पिन देण्यात आली. 

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

६८ व्या पदग्रहण सोहळ्याला रोटरीचे मावळते अध्यक्ष श्रीकांत भुर्के आणि सचिव प्रमोद कुलकर्णी यांनी नवीन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या तसेच मागील वर्षातील त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल उपस्थित सर्व मान्यवरांसमोर सादर केला. यावेळी केतनकुमार चौधरी, अ‍ॅड. शाल्मली आंबुलकर, इन्स्टॉलेशन इव्हेंट चेअरमन रोटे. निलेश मुळ्ये,रोटरी मिडटाऊन सदस्य, रोटरी क्लबचे सर्व सदस्य, व्यापारी आणि तमाम रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी रोटे. राहुल पंडित आणि रोटे. मुग्धा कुळये यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments