Header Ads Widget

एक वही, एक पेन : विधायक उपक्रम


एक वही, एक पेन : विधायक उपक्रम

शिवतेज ग्रामस्थ मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळाचा विधायक उपक्रम

संदीप शेमणकर

राजापूर -  राजापूर तालुक्यातील नाटे गावातील शिवतेज ग्रामस्थ  मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळ गेली अनेक वर्षे कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या विभागात दरवर्षी  लोकपयोगी, नावीन्यपूर्ण विधायक उपक्रम हे मंडळ यशस्वीपणे राबवीत असते. गेल्या वर्षभरात मंडळातर्फे महिलांसाठी सेनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण, शालेय मुलांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत छत्रीवाटप, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, दिवाळीत प्रत्येक घरात रांगोळी साहित्याचे मोफत वितरण, वृक्षारोपण, ज्ञानाची शिदोरी हा शैक्षणिक नावीन्यपूर्ण उपक्रम, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा यांसारखे विधायक उपक्रम राबवण्यात आले.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

मंडळाचा विधायक कामाचा आलेख खूप मोठा आहे. विभागातील शेकडो ग्रामस्थांच्या डोळ्यांचे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरे भरवून मोतीबिंदूचे निदान झाले. त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात कोरोना काळात उत्तम काम केल्याबद्दल डाॅक्टरांना कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे शिवतेज ग्रामस्थ मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळाने पंचक्रोशी आणि तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

या वर्षी पुन्हा एकदा उंच भरारी घेत मंडळाने एक पेन एक वही या उप्रकमाचे नियोजन करून आपल्या भागात शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी वही व पेन देऊन शालेय विद्यार्थी मित्रांना एक हात मदतीचा देण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम हे मंडळ दरवर्षी यशस्वीपणे राबवते. या उपक्रमासाठी  दानशूर व्यक्तींनी मोठ्या मनाने आपला एक हात मदतीचा देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवतेज ग्रामस्थ मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळाचे विद्यमान प्रमुख कार्यवाह  उमेश जवरे आणि राजेश मांडवकर, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष  रविकांत जवरे, दीपक घाडी, किशोर जवरे यांनी केला आहे. या उपक्रमासाठी मदत करायची असल्यास आणि गुगल पे नंबर ८९७६२८०८९० या नंबरवर आपण गुगल पेद्वारे देणगी देऊन सहकार्य करू शकता. आपले मदतीचे एक पाऊल शालेय विद्यार्थी मित्रांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी भरारी घेण्यासाठी  खूप मोलाचे ठरू शकते. 

Post a Comment

0 Comments