Header Ads Widget

krishna bavkar : सौ.आनंदीबाई गोखले विद्यालयाला संगणक भेट


कृष्णा बावकर यांचा मोठेपणा

सौ.आनंदीबाई कृ.गोखले विद्यालयाला संगणक भेट 

संदीप शेमणकर 

आडिवरे - आडिवरे येथील राजवाडीतील कांगापूरचे रहिवासी आणि आयटी क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कृष्णा बावकर यांनी कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय,धाऊलवल्ली या विद्यालयाला संपूर्ण संगणक संच भेट दिला. डिजिटल स्कूलसाठी मोलाचे कार्य केल्याबद्दल कृष्णा बावकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 


पैसे हवेत, नो टेन्शन http://loan.gromo.in/fb/dj0j3B0N3j

आपल्या परिसरातील शाळा शैक्षणिक क्षेत्रात पुढे आल्या पाहिजेत या उदात्त हेतूने त्यांनी आजपर्यंत एकूण सात संगणक इतरही शाळांनाही भेट दिले आहेत. 'आडिवरे टाइम्स'चे संपादक संदीप शेमणकर यांनी या शाळेबाबत अनेकदा बातम्या दिल्या. त्यामुळे गोखले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी मदत करावी, अशी भावना कृष्णा बावकर यांनी बोलून दाखवली आणि त्यांनी पुढाकार घेत शाळेला संगणक संच भेट दिला.

भेट द्या आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला

गोखले हायस्कूलचे अध्यक्ष के.पी. गोखले आणि सचिव रमेश पाडेकर यांनी कृष्णा बावकर यांचे आभार मानले. तसेच वेळोवेळी कोणताही मोबदला न घेता प्रशालेच्या बातम्या प्रसारीत करत असल्याबद्दल संदीप शेमणकर  यांचेही आभार मानले.यावेळी मोगरे गावातील आणि गोखले हायस्कूलचे माजी विद्यार्थी सुनील शिवगण, सुनील साखरकर, प्रकाश चव्हाण यांनी उपस्थित राहून आपल्या शाळेविषयीच्या जुन्या आठवणी व्यक्त केल्या. 


तसेच मोगरे गावचे माजी सरपंच अनंत शेमणकर यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून स्वतःचे शालेय जीवन सांगत विद्यार्थ्यांना शाळेविषयी कायम ऋणी राहा, असे सांगितले. सदर कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक मधुकर वेलये, प्रशालेतील समस्त कर्मचारी वृंद, विद्यार्थी वर्गही उपस्थित होते.

NEWSVALLEY YOUTUBE CHANNEL

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशालेतील शिक्षिका हळदणकर यांनी केले. यावेळी कृष्णा बावकर, संदीप शेमणकर तसेच त्यांचे सहकारी आणि संपूर्ण टीमचे प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भेट द्या - आडिवरे टाइम्स फेसबुक अकाऊंट

Post a Comment

0 Comments