वाचकांची पसंती हीच आडिवरे टाइम्सची पुण्याई
आडिवरे टाइम्स हे वाचकांच्या पसंतीला उतरलंय. आडिवरे टाइम्स फेसबुक पेज आणि आडिवरे टाइम्स फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आडिवरे टाइम्सने वाचकांची संख्या पाच हजार इतकी गाठली होती. दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे आडिवरे टाइम्सचं फेसबुक अकाऊंट बंद झालं. त्यामुळे नव्याने आडिवरे टाइम्स फेसबुक अकाऊंट आणि फेसबुक पेज सुरु करण्यात आलं. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. वाचकांची पसंती पाहून आणि वाढता प्रतिसाद पाहून गेल्या १५ दिवसांपूर्वी आडिवरे टाइम्स (www.adiwaretimes.blogspot.com) सुरू करण्यात आला. याला सर्वच स्तरातील वाचकांची पसंती मिळाली आणि मिळत आहे. नावामुळे भौगोलिक मर्यादा येईल असं वाटत होतं. मात्र तसं काही नाही. परदेशातूनही वाचकांची पसंती वाढत आहे. आज आडिवरे टाइम्स पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वाढणाऱ्या वाचक संख्येमुळे जबाबदारीही वाढत आहे. त्यात नव्याने काही देण्याचाही प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांबरोबरच इतर काही सकारात्मक घटना देण्याचा विचार सुरू करण्यात आलाय. ज्यांना आडिवरे टाइम्समध्ये लिहायची संधी हवी आहे त्यांनीही ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आडिवरे टाइम्स हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे.
आडिवरे टाइम्सचा वाचक हा सजग आहे. आडिवरे टाइम्सच्या वाचकांच्या पसंतीकडेही लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे वाचकांनी हक्काने आपल्याकडील माहिती आडिवरे टाइम्सकडे पाठवायची आहे. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, तुमचे अनुभव आडिवरे टाइम्सबरोबर शेअर करू शकणार आहात. समस्या असेल तरी ती मांडू शकणार आहे. कारण आडिवरे टाइम्स हे वाचकांचं मुक्त व्यासपीठ आहे. आपलं सर्वांचं सहकार्य असंच लाभत राहो हीच विनंती. तेव्हा रोज भेट द्या www.adiwaretimes.blogspot.com या ब्लॉगला आणि वाचनाचा आनंद घ्या.
संपादक
आडिवरे टाइम्स
0 Comments