नवी दिल्ली - केंद्र सरकारने 28 मे 2025 रोजी खरीप हंगाम 2025-26 या वर्षासाठी 14 प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजे एमएसपीमध्ये वाढ जाहीर केलीय. यात धान, मका, ज्वारी, बाजरी, रागी, तूर, उडीद, सोयाबीन, तीळ, कापूस यांसारख्या पिकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयासाठी 2.07 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. हा निधी गेल्या खरीप हंगामापेक्षा 7 हजार कोटींनी जास्त आहे.
एमएसपी 2,369 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आलाय. हा एमएसपी गेल्या वर्षीपेक्षा 69 रुपये जास्त आहे. तूर डाळीसाठी सर्वाधिक 450 रुपयांची वाढ होऊन नवीन एमएसपी 8000 रुपये प्रतिक्विंटल झालीय. तर सोयाबीनसाठी 5328 रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केलाय. त्यामुळे सोयाबीनमध्ये 436 रुपयांची वाढ झालीय. कपाशीच्या दोन्ही प्रकारांसाठी 589 रुपयांची वाढ झालीय. मिडियम स्टेपल कपाशी 7710 आणि लाँग स्टेपल 8110 रुपये प्रति गाठ दराने विकली जाईल. बाजरी, तूर आणि उडीद यांसारख्या पिकांच्या एमएसपीमध्येही लक्षणीय वाढ झालीय, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. हा निर्णय शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा किमान 50 टक्के अधिक नफा मिळवून देईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे.
पीक - नवीन एमएसपी क्विंटल रुपये - वाढ रुपये
बाजरी -2775 - 150
मका -2400 - 175
मूग डाळ - 8768 - 86
उडीद डाळ - 7800 - 400
मूगफली - 7263 -480
या एमएसपी वाढीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. ही वाढ शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देईल. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विशेषतः मका, तूर आणि सोयाबीनसारख्या पिकांचं उत्पादन वाढू शकतं. याव्यतिरिक्त सरकारने 5 लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्ज योजनेचाही विचार केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल. या निर्णयाचे सामाजिक आणि आर्थिक परिणामही महत्त्वाचे आहेत. एमएसीपी वाढीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ग्रामीण बाजारपेठा आणि छोट्या उद्योगांवर सकारात्मक परिणाम होईल. पिकांचं उत्पादन वाढल्याने अन्नसुरक्षाही मजबूत होईल.
शेतकऱ्यांची आंदोलनं आणि एमएसपीच्या कायदेशीर हमीच्या मागणीसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढला होता. मात्र एमएसपी वाढीचा निर्णय घेऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकलाय. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचं कौतुक केलंय. खरीप हंगाम 2025-26 साठी एमएसपी वाढीचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासा देणारा आहे. बाजारातील अस्थिरता कमी होण्यास मदत करणारा आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
.png)
0 Comments