Header Ads Widget

finolex ratnagiri : फिनोलेक्स कंपनीतर्फे बियाणे वाटप


फिनोलेक्स कंपनीतर्फे बियाणे वाटप, शेतकऱ्यांनी मानले आभार

रत्नागिरी -  फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने फणसोप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड फणसोपचे अध्यक्ष मनोज साळवी आणि उपाध्यक्ष समीर साळवी यांच्या मागणीनुसार फणसोप व कसोप येथील शेतकऱ्यांना मोफत भातशेती बियाण्याचे वाटप करण्यात आले. 

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन  दरवर्षी फणसोप व कसोप येथील शेतकऱ्यांना भातबियाण्यांचे वाटप करते. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊडेशनच्या रितू  झाब्रिया कायम सर्व सामाजिक, धार्मिक, सार्वजनिक कामात आणि इतर कामांना सहकार्य करीत असतात, असे अध्यक्ष मनोज साळवी व उपाध्यक्ष समीर साळवी यांनी सांगितले. सोसायटीच्या वतीने फिनोलेक्सच्या संचालक रितू झाब्रिया आणि अधिकारी नायक, चिवटे, अभिषेक साळवी यांचे आभार मानण्यात आले.  त्यावेळी सरपंच गिरीराज ऊर्फ बाबा साळवी, सोसायटीच्या सदस्या रेणुका आग्रे, सचिव बाबू साळवी, ग्रामपंचायत सदस्य राकेश  साळवी, रितेश साळवी, प्रवीण साळवी आणि शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments