पालघरमध्ये आदित्योत्सव, कार्यकर्त्यांचा जल्लोष
- संदीप शेमणकर
नालासोपारा - युवासेना आणि युवतीसेना विस्तारक आणि पालघर उपजिल्हा संघटक कल्याणी पाटील यांच्या संकल्पनेतून पालघर लोकसभा क्षेत्रात आदित्य उत्सवाची सुरुवात २०२३ पासून सुरू करण्यात आली. यंदाही पालघरमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आदित्य उत्सव २०२४ संपन्न झाला.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या वर्षी आदिवासी पाडे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेनिटरी नॅपकिन पुरवण्याचा संकल्प आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. यंदाही उपक्रमाची सुरुवात कलानगरमधील मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदच्या शाळेत वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना युवासेना पालघर लोकसभा पदाधिकारी, युवतीसेना कल्याण लोकसभा पदाधिकारी शिवसैनिक, महिला आघाडी युवासेना उपस्थिती होते. गेल्या वर्षी वसई सागरी किनाऱ्याची साफसफाई करत आदित्य उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती.


0 Comments