school start : शनिवारपासून वाजणार शाळेची घंटा
नवीन शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड
संगमेश्वर - महिना भराच्या दीर्घ उन्हाळी सुटीनंतर १५ जूनपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू होत असल्याने शालेय वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत, तर शालापयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही संगमेश्वर बाजारपेठेत गर्दी होत आहे.
![]() |
| https://amzn.to/3zbQi7O |
गेल्या शैक्षणिक वर्षातील वार्षिक परीक्षा संपल्यानंतर शाळांना उन्हाळ्याची सुटी लागली. जवळजवळ एक महिन्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळां १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळांमधून गणवेश, पुस्तके मिळतात; पण इतर शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने खरेदी कराव्या लागतात. यासाठी वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, दप्तर, सॅक आदींसह शालोपयोगी वस्तूंनी संगमेश्वर बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. अशा वस्तू खरेदी करायला बाजारपेठेमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होऊ लागली आहे. विविध कंपन्यांच्या वह्या, पेन, पेन्सिल, सॅक तसेच इतर वस्तू खरेदी करण्यात विद्यार्थी दंग आहेत. पंधरा जूनला शाळांचा परिसर गजबजणार असून, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
"शाळा सुरू होण्याअगोदर आम्ही विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार वह्या, पुस्तके, दर्जेदार अशा सॅकसह शालोपयोगी साहित्य बाजारात आणले आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या आवडीनुसार सवलतीच्या दरात त्याची विक्री करत आहोत'' - सुनिल दोरकडे, व्यापारी संगमेश्वर



0 Comments