मामासाहेब भुवड महाविद्यालय वृक्ष लागवड
नवी मुंबई माजी उपमहापौर अविनाश लाड यांचा पुढाकार
संगमेश्वर - कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर संस्थेच्या देवरूख येथील मामासाहेब भुवड महाविद्यालय परिसरात नवी मुंबई माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्था अध्यक्ष शांताराम सालप, शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष सुरेश ऊर्फ भाऊ कांगणे, माजी पंचायत समिती सदस्य शीतल करंबेले, कुणबी सहकारी बँक संचालक पी. डी. ठोंबरे , प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक रमेश गोताड आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |


0 Comments