Header Ads Widget

OBC Reservation : आरक्षण वाचवणार, आता कुणब्यांचा एल्गार

 



मुंबई : सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबी-ओबीसी समाज आंदोलन करणार आहे. 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश निदर्शने करण्यात येणार आहेत. यासाठी  कुणबी तसेच ओबीसी बंधू-भगिनी, युवक - युवती आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि वसईतमध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत.  

वसईत हे आंदोलन  वसई तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.  

नियोजन : विभागीय शाखा विरार, तालुका शाखा वसई. 

प्रमुख निमंत्रक: कृष्णा वणे, किशोर भेरे, अनंत फिलसे, एकनाथ डिंगनकर, अविनाश पाचकले आणि अन्य सहकारी 

बोरिवली पश्चिम, तहसील कार्यालय 

निमंत्रक: मधुकर तोरस्कर, अरविंद डाफळे, अॅड. अवधूत तोरस्कर, महेश शिर्के, गिरीश बारस्कर, बबनराव कांबळे, संजय वारीक. युवराज संतोष, सचिन रामाणे आणि सहकारी.

अंधेरी तहसील कार्यालय

नियोजन : विलेपार्ले पूर्व शाखा, जोगेश्वरी पूर्व शाखा

निमंत्रण: माधव कांबळे, रमेशराव कानावले, महादेव शितप, विजय भोस्तेकर, विष्णू खापरे, सूर्यकांत गवाणकर.

वांद्रे कलेक्टर ऑफिस

नियोजन: विभागीय शाखा: चेंबूर ट्रॉम्बे

निमंत्रक: उदय कठे, भास्करराव चव्हाण, बाळकृष्ण पुजारे, महेश पेंढारी, मनोहर पवार.

जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट 

नियोजन: अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ.

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई-विभागीय शाखा वरळी

निमंत्रण: रवी बावकर, रवींद्र मटकर, संतोष चौगुले, चंद्रकांत निर्मळ, रवींद्र कुरतडकर, अनिल भोवड आणि सहकारी. 

मुलुंड तहसील कार्यालय

नियोजन: कुणबी समाजोन्नती संघ मुंबई - विक्रोळी-घाटकोपर शाखा

कुणबी समाज विकास संघ मुलुंड

निमंत्रण : सोनू शिवगण, सुरेश मांडवकर, मनीष वालम. 

ठाणे शहर, कलेक्टर आणि तहसील कार्यालय

नियोजन : ठाणे शहर कुणबी सेवा संघ

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा, ठाणे शहर शाखा, नवी मुंबई शाखा

निमंत्रण: मिलिंद महाडिक, राजेंद्र जोशी, बबनराव उंडरे, संभाजी काजरेकर, पुनीत खांडेकर आणि सहकारी.

पनवेल तालुका तहसील कार्यालय

नियोजन : कुणबी संघटना आणि अनिल मोंडे आणि सर्व पदाधिकारी.

राज्य सरकारच्या विरोधात ओबीसींचे आक्रोश मोर्चे निघणार आहेत. कुणबी दाखले देऊन मराठ्यांची ओबीसीमध्ये घुसखोरी थांबवली पाहिजे, राजकीय आरक्षण बचाव तसेच ओबीसीसह सर्वच वर्गाची जातनिहाय जनगणना करावी यासाठी ही निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

#कुणबीएल्गार
#OBCReservation
#ओबीसीआरक्षणबचाव
#MarathaReservation
#आरक्षणआंदोलन
#MumbaiProtest
#VasaiMorcha
#ThaneMorcha
#AndheriProtest
#BandraCollectorOffice
#KunbiSamaj
#OBCVoice
#ReservationPolitics
#CasteCensus


Post a Comment

0 Comments