देशभरातून मातृभूमीचा जयघोष ऐकू येतो आहे-मोदी
आज देशभरातून मातृभूमीचा जयघोष ऐकू येतो आहे. महात्मा गांधींच्या सिद्धांतावर चालत असताना संविधान सभेच्या सदस्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भारताचं संविधान ७५ वर्षांपासून दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवतो आहे.अनेक महापुरुषांनी जसे की डॉ. राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, पंडीत नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सर्वपल्ली राधाकृष्णन या सगळ्यांनीच संविधान निर्मितीसाठी योगदान दिलं. नारी शक्तीमधल्या विदुषींनीही भारताचं संविधान सशक्त केलं. आज लाल किल्ल्यावरुन देशाला दिशा देणाऱ्या संविधानाची निर्मिती करणाऱ्यांना आदराने नमन करतो
न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही-मोदी
ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी शौर्य आणि पराक्रम दाखवला त्या सगळ्या वीरांचं कौतुक कऱण्याची संधी मला मिळाली आहे. शत्रूला त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक शासन करण्याचं काम आपल्या जवानांनी आणि सैन्य दलांनी केलं. धर्म विचारुन पहलगाममध्ये लोकांना मारलं गेलं. पत्नीसमोर पतीला मारलं, मुलांसमोर त्यांच्या वडिलांना ठार केलं. संपूर्ण हिंदुस्थानात या घटनेने आक्रोश होता. या प्रकाराच्या हल्ल्यामुळे जग हादरुन गेलं होतं. पण ऑपरेशन सिंदूर या आक्रोशाचं उत्तर होतं. २२ एप्रिलनंतर आपण आपल्या सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सूट दिली होती. रणनीती त्यांनी ठरवावी, वेळ त्यांनी ठरवावी, लक्ष्य त्यांनी ठरवावं आणि आपल्या सैन्य दलांनी अशी कामगिरी केली जी अनेक वर्षांत झाली नाही. आपल्या सैन्य दलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानची झोप अजूनही उडाली आहे. पाकिस्तानात झालेला विध्वंस इतका मोठा आहे की रोज नवे खुलासे होत आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आता न्यूक्लिअर ब्लॅकमेल कधीही सहन करणार नाही. दहशतवाद माजवणारे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारे सगळ्यांना एकच मानलं जाईल. तसंच सैन्य दलांना त्यांच्या विरोधात कारवाईची खुली सूट असेल. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आजवर खूप सहन केलं आता अजिबात सहन करणार नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पाकिस्तानला पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरील भाषणातून ठणकावलं. (सौजन्य-लोकसत्ता.डॉट.कॉम)
.png)
0 Comments