लांजा - लांजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यतत्पर पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव यांची नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नती मुळे त्यांच्यावर सर्वच स्तरावरून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते त्यांचा नुकताच पदोन्नती मिळाल्याबाबत सन्मान करण्यात आला.
संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे हे सचिन भुजबळराव यांचे गाव असून 29 वर्षांपूर्वी ते पोलीस खात्यात रुजू झाले. चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ते कार्यरत होते. 29 वर्षाच्या सेवा कार्यकाळात त्यांनी चिपळूण, संगमेश्वर, देवरुख या पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल या पदावर सेवा बजावली. गेले काही वर्ष ते लांजा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सचिन भुजबळराव यांनी एक कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कर्तव्यसेवेची दखल पोलीस प्रशासनाने घेऊन सन 2021 साली महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक पद (महाराष्ट्र पदक) देऊन सन्मानित केले होते. आजपर्यत ते रायटर म्हणुन काम करत आहेत. पोलिसी खाकी वर्दीशी एकनिष्ठ राहून कोणतेही सामाजिक कार्य असो त्या चळवळीतही त्यांचा फार मोठा सहभाग असतो. त्यांची सेवा आणि कार्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाकडून त्यांची सहाय्यकपदी पदोन्नती जाहीर केली.
नुकतेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते त्यांचा स्टार आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सचिन भुजबळराव पोलीस हेड कॉन्स्टेबलचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे समजताच त्यांना प्रत्यक्षात भेटून तसेच सोशल मीडिया वरून तसेच अनेकांकडून कॉल करून अभिनंदनाचा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरु आहे.
.png)
0 Comments