Header Ads Widget

ROHIT SHARMA : हिटमॅन रोहितचा चाहत्यांना धक्का


विशेष प्रतिनिधी

मुंबई - हिटमॅन रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत क्रिकेटचाहत्यांना मोठा धक्का दिलाय. फॉर्मात असतानाही रोहित शर्माने निवृत्ती का घेतली, काय आहेत त्यामागची कारणं आणि  इंग्लंड दौऱ्यात कोण असेल नवा कर्णधार, रोहित शर्मा आणि धोनीच्या पोस्टमध्ये काय साम्य काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला पाहण्यासाठी क्लिक करा

किक्रेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत आणि हिटमॅन असलेल्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतलीय. रोहित शर्माच्या तडाकफडकी निर्णयामुळे क्रिकटेचाहत्यांना मोठा धक्का बसलाच आहे, मात्र अशी अचानक निवृत्ती का घेतली हे प्रश्नही निर्माण झाले आहेत. आयपीएल 2025 खेळतानाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा रोहितचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. 

न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा

आयपीएलनंतर टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो उत्कृष्ट फलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माची निवड होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाल्या. मात्र निवड समितीने संघ निवडण्यापूर्वीच रोहित शर्माने कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याचे स्पष्ट केलंय. 

आडिवरे टाइम्स फेसबुक पेज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माने उत्तम नेतृत्व केलं नव्हतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो कर्णधार होता, मात्र भारताला पराभव पत्करावा लागला होता. परिणामी भारताला डब्ल्यूटीसीच्या फायनलला मुकावं लागलं. यावेळी रोहित शर्मावर जोरदार टीकाही झाली. इतकंच काय तर शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात त्याला डावलण्यात आलं. 

निवड समिती आणि रोहित शर्मा यांच्यात आठवडाभर चर्चा सुरू होती. इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने खेळायची इच्छा रोहित शर्माने बोलून दाखवली होती. त्यासाठी त्याने कर्णधारपदही सोडून देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र निवड समितीला संपूर्ण मालिकेचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधाराची नियुक्ती करायची होती, अशी चर्चा होती. त्यामुळे अखेर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं.


विराट कोहलीनंतर रोहित शर्माने भारतीय कसोटी संघाला चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. मात्र त्याला सूर गवसला नाही. रोहितने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळले. 116 डावात फलंदाजी करताना 40.57 च्या सरासरीने 4,301 धावा केल्या. त्याची 212 धावांची खेळी ही सर्वोच्च होती. कसोटीमध्ये रोहितने 18 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत.

एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीच्या पोस्टमध्ये साम्य आहे. दोघांनीही एकाच वेळी पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर निवृत्ती जाहीर केली ती वेळ होती संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांची. तर पाच वर्षांपूर्वी धोनीने निवृत्ती घेतली त्याचीही वेळ होती 7 वाजून 29 मिनिटांची. या योगायोगाबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगलीय. 

व्हाट्सअप ग्रुप वर सामील होण्यासाठी क्लिक करा

टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी शुभमन गिलचं नाव चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघ निवडला जाईल तेव्हा नव्या कसोटी कर्णधाराचाही निर्णय होईल. शुभमन गिलसह जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हेही कर्णधारपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जातंय. एकूणच राहुल शर्माची कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीही क्रिकेटप्रेमींना चटका लावणारी आहे. 


Post a Comment

0 Comments