भारताने रात्रीच्या वेळी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, त्यापेक्षाही मोठी रणनीती म्हणून मोदी सरकारने वॉटर स्ट्राईक करून पाकिस्तानची पाणीकोंडी केलीय. पहलगाम हल्ल्याचा सूड घेण्याचा भारताचा निर्धार ठाम आहे. दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्यानंतरही भारताने वॉटरस्ट्राईक सुरूच ठेवलाय. त्यामुळे पाकिस्तानची मोठी पाणीकोंडी झालीय.
आडिवरे टाइम्स यूट्युब चॅनेलला भेट द्या
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्यासाठी मोदी सरकारने वॉटरस्ट्राईकचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यातला पहिला स्ट्राईक म्हणजे सिंधू पाणीवाटप करार भारताने रद्द केला. भारत यावर थांबला नाही तर वुलर सरोवराचे पाणीही बंद केलं. त्यातच पुढचं पाऊल म्हणजे चिनाब नदीवर असलेल्या बागलिहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय भारताने घेतलाय. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात पुढील काही दिवसात पाण्यासाठी हाहाकार उडू शकतो.
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल नक्की पाहा
भारताने बगलिहार धरणातील पाण्याबरोबर सलाल धरणाचं पाणीही रोखलंय. त्यामुळे पाकिस्तानातून वाहणारी नदी कोरडी ठाक पडलीय. भारताच्या या धक्कातंत्राचा मोठा फटका सिंध आणि पंजाब प्रांतांना बसणार आहे. भारताच्या वॉटरस्टाईकचा फटका 24 शहरांना बसणार आहे. चिनीऊट, हाफिजाबाद, फैजलबाद, मुज्जपरगड या शहरांमध्ये राहणारी जवळपास 80 टक्के जनता ही चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा मोठा सामना पाकिस्तानी जनतेला करावा लागेल.
इतंकच नव्हे, चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही परिणाम भोगावे लागणार आहेत. 10 जूनपर्यंतच्या खरीप हंगामात पाकिस्तानला 21 टक्के पाण्याची कमतरता जाणवू शकते असं आयआरएसएनं म्हटलंय. याबाबत आयआरएसएचे अध्यक्ष मुहम्मद शब्बीर यांनी भारताची कारवाई आणि पाकिस्तानातली स्थिती याबाबत चिंता व्यक्ती केलीय. तसंच भारताने चिनाब नदीचं पाणी सोडलं नाही तर पाकिस्तानातील पाणीबाणी अधिक गंभीर होऊ शकते, असंही समितीनं म्हटलंय. तर दुसरीकडे पुढच्या काही दिवसात झेलम नदीचं पाणी किशनगंगा धरणावर रोखण्याची भारताची योजना असल्याचीही चर्चा आहे.
एकूणच भारताने पाकिस्तानची चोहोबाजूने कोंडी केलीय. त्यातील वॉटरस्ट्राईकमुळे पाकिस्तानात पाणीबाणी निर्माण झालीय. लष्करी कारवाईपेक्षाही पाणीकोंडी पाकिस्तानच्या घशाला कोरड पाडणारी आहे.
जनतेचा आवाज...आडिवरे टाइम्स
*********
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क - 9833833655
*********
व्हाट्सअप ग्रुप वर सामील होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JtgYL3Djhy4ES6E0Jc8VGR
.png)
.png)
0 Comments