Header Ads Widget

riyan parag 6 ball 6 sixes : रियान पराग, 6 बॉल आणि 6 सिक्स


आयपीएल 2025मध्ये धडाकेबाज खेळी पाहायला मिळत आहेत. ईडन गार्डन्सवर तर षटकारांचा पाऊस पडतोय. राजस्थान रॉयल्सचा बॅट्समन रियान परागने 6 चेंडूंत 6 षटकार मारून वादळी खेळी तर केलीच, क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचं पारणंही फेडलं. तरी तो युवराजची बरोबरी करू शकला नाही. 

आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला भेट द्या

 राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेल्या रियान परागने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकत ईडन गार्डन्सवर वादळी खेळी साकारली. त्याच्या या जबरदस्त खेळीने क्रिकेटचाहत्यांनी जल्लोष केलाय. रियाने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात षटकारांची आतषबाजी करत त्यांना सळो की पळो करून सोडलं. बॉलर मोईन अलीला स्वप्नातही वाटलं नसेल की रियान त्याच्या गोलंदाजीची पिसं काढेल. राजस्थानच्या डावाच्या 13 व्या षटकात रियानने मोईन अलीच्या एका षटकात 5 षटकार मारले. तर वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रायनने पुन्हा षटकार ठोकला. कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे कर्णधारपदाची जबाबदारी रियान परागवर आली होती. रियान परागही यावेळी फॉर्मात नव्हता, मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरोधात 6 षटकार मारत त्याने आपली क्षमता दाखवली आणि क्रिकेटरसिकांना चकीत केलं. 

न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेलला भेट द्या

रियान परागच्या खेळीमुळे तुम्हाला कुणाची आठवण आली असेल तर ती युवराज सिंह यांची. युवराज सिंह यानेही सलग 6 षटकार मारत इतिहास रचला होता. रियान परागने सलग 6 षटकार मारले तरी तो युवराजची बरोबरी करू शकला नाही. कारण युवराज सिंहने एकाच षटकात 6 षटकार मारले होते, मात्र ही कामगिरी रियान परागला करता आली नाही. असं असलं तरी रियानची सलग 6 षटकार मारण्याची जबरदस्त खेळी आठवणीत राहणारी आहे. 

आयपीएलमध्ये 5 षटकार मारणारे क्रिकेटपटू

फलंदाज - गोलंदाज

क्रिस गेल - राहुल शर्मा

राहुल तेवतिया -एस कॉटरेल 

रवींद्र जडेजा - हर्षल पटेल 

रिंकू सिंह - यश दयाल 

आडिवरे टाइम्स फेसबुक पेज 

एकूणच रियान परागच्या 6 षटकारांच्या आतषबाजीने आयपीएलमध्ये रंगत आणलीय. एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम जरी परागला करता आला नाही तरी त्यांच्या ईडन गार्डन्सवरील वादळी खेळीला क्रिकेटचाहते कधीच विसरणार नाहीत, एवढं नक्की.




Post a Comment

0 Comments