उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत. राज्यातल्या काही जिल्ह्यांचा पारा चाळिशी पार आहे. हवाही गरम झालीय. त्यामुळे मंद हवेची झुळूकही गारवा न देता चटका देतेय. शहरातले तर रस्ते तापले आहेत. चोहोबाजूंनी होरपळ वाढलीय. या सर्वांचा आरोग्यावर परिणाम होतोय. ऋतूप्रमाणे आरोग्य बदलत राहतं. त्यामुळे आरोग्य कसं जपावं, काय खावं काय टाळावं, कोणते कपडे परिधान करावेत ते पाहूयात.
कशी घ्याल आरोग्याची काळजी ?
-सकाळी उठल्यावर व्यायाय करायला जात असाल तर सोबत पाण्याची बाटलीही घेऊन जा
-सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने स्नान करा. थंड पाण्याने स्नान करणं शक्य नसेल तर कोमट पाणी वापरा. अगदी गरम पाण्याने स्नान करणं टाळा.
-अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा.
-घराबाहेर पडण्याची वेळच आली तर शरीर पूर्ण झाकेल असे कपडे वापरा. त्यात काळे कपडे परिधान करू नयेत. सफेद कपडे परिधान केल्यास ऊन परावर्तीत होण्यास मदत होते.
-घराबाहेर जाताना ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर जवळ ठेवा.
-कांद्याचा वास जरी उग्र असला तरी आहारात कांद्याचा वापर करावा. कांदा हा थंड असल्याने शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवतो.
- लिंबू पाणी किंवा उसाच्या रसात बर्फ टाकून पिऊ नये. सरबतांमध्ये शक्यतो सब्जाचा वापर करावा. कोकम सरबत, पन्हे आणि लिंबू सरबत पिणं शरीरासाठी आरोग्यदायक असतं.
आवडीने पाहा न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल
- थोड्या थोड्या वेळाने थंड पाणी प्यावं, मात्र हे पाणी फ्रीजमधील नसावे. थंड पाण्यासाठी माठाचा वापर करावा.
- कोणतीही सॉफ्ट ड्रिंक्स न घेता नारळ पाणी, ताक यांचे नियमित सेवन करा
- तेलकट, मसालेदार, मांसाहार आणि रस्त्यावरील उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. खारट पदार्थही टाळावेत.
- गोड चवीचे पदार्थ प्रमाणात खाणं, पचायला हलका असा आहार घेणं.
भेट द्या आडिवरे टाइम्स फेसबुक पेज
-उन्हातून जाताना गॉगल, छत्री आणि टोपीचा अवश्य वापर करा
- आहारात जास्तीत जास्त फळांचा वापर करा. ज्या फळांमध्ये जास्त रस आहे अशा फळांचा समावेश करा.
आडिवरे टाइम्सच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
----
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा
.png)
.png)
0 Comments