भारताचं सुदर्शन चक्र एस 400ची कमाल
पाकिस्तानचे हल्ले भारताने निष्प्रभ ठरवले
मध्यरात्री सीमेवर नेमकं काय घडलं?
विशेष प्रतिनिधी
जम्मू - काश्मीर : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आणि गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले, मात्र भारताच्या एस 400 या डिफेन्स सिस्टिमने हे हल्ले निष्प्रभ केले. त्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळाले.
भारताचा एअर स्ट्राईक जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानने शेवटी आगळीक केलीच. भारतावर ड्रोनने हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात भारताला ब्लॅकआऊट करावा लागला.
आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला पाहण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार नसेल तर भारत कसला ? भारताने पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. भारताच्या एस 400 डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले परतवून लावलेच, त्याचबरोबर पाकिस्तानची डिफेन्स सिस्टिमही उद्ध्वस्त केली. पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख उत्तर देताना भारतानेही पाकिस्तानच्या काही शहरांवर हल्ले केले. भारतानं पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. त्यानंतर जळफळाट झालेल्या पाकिस्तानने भारतातील 15 शहरांना लक्ष्य केलं. आणि मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या भारतानं हे मिसाईल हवेतच उद्ध्वस्त केली आणि करून पाकिस्तानचे मनसुबे हवेतच धुळीस मिळवले.
पाकिस्तानने जम्मू - काश्मीरमधील 8 ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. सतवारी, सांबा, आर. एस. पुरा आणि अर्णिया यांचा समावेश होता. त्याचवेळी भारतीय हवाई दलानं इंटीग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीम लाँच केली. शत्रूच्या मिसाईल्सचा अचूक लक्ष्यभेद करणारी S 400 सुदर्शन ही यंत्रणा होती. शिवाय बराक ८ एमआरएसएएम आणि भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राचाही समावेश होता. भारताने पाकिस्तानची जेएफ ही दोन लढाऊ विमाने आणि एफ 16 हे लढाऊ विमान उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानवर नामुष्की ओढवली.
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानकडून जम्मू विमानतळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता, मात्र बारताने तो हाणून पाडला.सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मूसह अनेक भागात ब्लॅक आऊट करण्यात आलं. त्यानंतर पाकिस्ताननं अखनूर, राजौरी, पूंछमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाकडून हे हल्ले परतवून लावले. त्याचवेळी श्रीनगर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अॅक्टिव्हेट करण्यात आली.
या सर्व घडामोडी घडत असतानाच भारताने अमेरिका, रशियासह अन्य राष्ट्रांशी संवाद साधला. तरी पाकिस्तान आगळीक करणार असेल तर पाकिस्तानला सावधच राहावं लागणार आहे. कारण पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे. भारताच्या तिन्ही दलाच्या शौर्याला आडिवरे टाइम्सचा सलाम.
.png)
0 Comments