विशेष प्रतिनिधी
जम्मू - काश्मीर : भारताने पाकिस्तानची अनेकदा खोड मोडलीय, मात्र पाकिस्तान गत ही कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखी. कुत्र्याची शेपटी कितीही वेळा नळीत घातली तरी वाकडीच राहते. तसं पाकिस्तानचं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने वॉटर स्ट्राईक करून पाणीकोंडी केलीच, मात्र आर्थिक कोंडी करून भारताने पाकिस्तानला नाक दाबून तोंड उघडायला लावलंय.
दहशतवादी पोसण्याच्या नावाखाली पाकिस्तान आधीच आर्थिक गर्तेत आहे. त्यातच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानवर आयातबंदी लागू केली. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा हा भारताचा महत्त्वाचा निर्णय ठरला. इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारताने हवाई मार्ग, भूमार्ग आणि अन्य मार्गांनी येणाऱ्या टपाल आणि पार्सल सेवांवरही बंदी घातली.देवाणघेवाणच बंद केल्याने पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसतोय.
आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला पाहण्यासाठी क्लिक करा
आर्थिक कोंडीचा सामना करताना नाकी नऊ आलेल्या पाकिस्तानने स्वत:च पायावर धोंडा मारुन घेतलाय. पाकिस्तानने अन्य देशांसाठी हवाई क्षेत्र बंद केलं. याचा फटका पाकिस्तानला मिळणाऱ्या विमान वाहतूक महसुलावर झालाय. पाकिस्तानचे लाखो डॉलरचं नुकसान सहन करावं लागतंय. भारतीय विमानं पाकिस्तानवरून जात नसल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांकडून मिळणारा ओव्हरफ्लाईट शुक्लावर पाणी सोडावं लागणार आहे. भारतातून युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना मार्ग बदलावा लागलाय. हे पाकिस्तानला चांगलंच महाग पडलंय. हवाई क्षेत्र बंदीमुळे पाकिस्तानलाच कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागतंय.
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची सर्वच स्तरावर कोंडी होताना दिसतेय. आयातबंदीबरोबरच भारताने पाकिस्तानी राष्ट्रध्वज असलेल्या जहाजांना बंदी घातलीय. या जहाजांना भारतीय बंदरात मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे जलवाहतुकीद्वारे मिळणारा महसूलही आटत चाललाय. आर्थिक कोंडी अधिकच वाढणार आहे.
ऑगस्ट 2019मध्ये कलम 370 हटवण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानने टपाल सेवा एकतर्फी बंद केली होती. तर तीन महिन्यांनंतर ती पुन्हा सुरू केली. आता भारताने सर्व टपाल आणि पार्सल सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 2004 मध्ये एप्रिल ते या वर्षी जानेवारी या कालावधीत भारताची पाकिस्तानला निर्यात 44 कोटी 76 लाख डॉलर इतकी होती, तर आयात ४२ लाख डॉलर होती.
भारताच्या एअर स्ट्राईकचा फटका पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजलाही बसलाय.रोजच पडणारा पाकिस्तानचा शेअर बाजार क्रॅश होतोय. गुरुवारी शेअर बाजार जवळपास 7 हजार अंकांनी घसरला. आता तर युद्ध सुरूच झालंय. याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर होणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप वर सामील होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताने 'आयएमएफ'बरोबरच जागतिक संस्थांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पाकिस्तानचा तिळपापड झालाय.
*********
जनतेचा आवाज...आडिवरे टाइम्स
*********
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क - 9833833655
.png)
.png)
0 Comments