मुंबई - भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीयेने पाकिस्तानला समर्थन दिलं, याच समर्थनाचे परिणाम आता तुर्कीयेला भोगावे लागताहेत. कारण तुर्कीयेने पाकिस्तानची बाजू घेतल्याने भारतभर संतापाची लाट उसळली. तुर्कीयेला याचा पहिला फटका बसला तो बहिष्काराच्या स्वरुपात. भारताने अनेक ठिकाणी तुर्कीयेच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकलाय. पुण्यात तर फळ-विक्रेत्यांनी तुर्कीय सफरचंद न मागवण्याचा निर्णय घेतलाय.
आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला पाहण्यासाठी क्लिक करा
तुर्कीयमध्ये अनेक ठिकाणं ही पाहण्यासारखी आहेत. मात्र तुर्कीयेने पाकिस्तानला मदत केल्याने भारतीय नागरिकांनी स्ट्राईक केलाय. भारतात तर तुर्कीयेवरील बहिष्काराची लाट सुरू झालीय. अनेक प्रवाशांनी आणि पर्यटकांनी तुर्कीयेचे बुकिंग थांबवलंय. त्यातच सरकारने तुर्कीये देशात जाणाऱ्यांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. भारतीय पर्यटकांचे दौरेही रद्द करण्यात आले आहेत. याचे प्रमाण जवळपास 25 टक्क्यांपर्यंत पोहोचलंय.याचा फटका तुर्कीयेच्या पर्यटन व्यवसायाला बसलाय. एका टूर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अनेक टूर रद्द झाल्यामुळे तुर्कीय आणि अझरबैजानला सुमार 5000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख भारतीय पर्यटकांनी तुर्कीयेला भेट दिली होती. मात्र भारत - पाकिस्तान युद्धानंतर यात घट झालीय.
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावरही #BoycottTurkiye या हॅशटॅगसह भारतीय प्रतिक्रिया देत आहेत. एकीकडे मित्र म्हणून पाकिस्तानला 350 ड्रोन पुरवणारा तुर्कीयेला दुसरीकडे आर्थिक फटका सहन करावा लागतोय. एकूणच भारत - पाकिस्तान युद्धात भारताच्या विरोधी भूमिका घेणं आणि पाकिस्तानला मदत करणं तुर्कीयेच्या महागात पडलंय .
.png)
0 Comments