Header Ads Widget

bhargavastra : शत्रूंच्या ड्रोनचा कर्दनकाळ भार्गवास्त्र


मुंबई - 
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला केला. भारताच्या एस 400 सिस्टीमने तो परतवून लावला, मात्र आता भारताच्या भात्यात अजून एक अस्त्र आलंय ते म्हणजे भार्गवास्त्र.

सुदर्शन प्रणाली अर्थात एस 400 च्या खांद्याला खांदा लाऊन भार्गवास्त्र कार्य करू शकतं. इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि आरएफ रिसीव्हर्सच्या मदतीने 6 ते 10 किमीवरून भार्गवाश्त्र शत्रू राष्ट्राच्या ड्रोनचा शोधू घेऊ शकतं. इतकंच नव्हे तर भार्गवाश्त्र 2.5 किमी अंतरावर मारा करू शकतं आणि ड्रोनही नष्ट करू शकतं. भार्गवास्त्र हे स्वदेशी बनावटीचं आहे. त्याची यशस्वी चाचणी भारताने घेतलीय.  हे भार्गवास्त्र एकाच वेळी शत्रूराष्ट्राच्या ड्रोनवर  64 सूक्ष्म क्षेपणास्त्र डागू शकतं. एकाच वेळी 64 सूक्ष्म क्षेपणास्त्रं डागणारी जगातील पहिली संरक्षण प्रणाली आहे. 

भार्गवास्त्र हे एक स्वदेशी विकसित केलेले अँटी-ड्रोन सिस्टम आहे. भार्गवास्त्रची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत ती पाहूयात.

भार्गवास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये:

एकाच वेळी प्रक्षेपण : एकाच वेळी 64 पर्यंत सूक्ष्म क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्याची क्षमता. 

मोबाईल प्लॅटफॉर्म : विविध भूभागांवर त्वरित तैनात करता येतं

स्वस्त आणि प्रभावी : पारंपरिक हवाई संरक्षण उपायांपेक्षा स्वस्त आणि प्रभावी पर्याय.

स्वदेशी तंत्रज्ञान : पूर्णपणे स्वदेशी विकसित केलेले आणि मेक इन इंडियाला बळ देणारे. 

इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली : लक्ष्य अचूकपणे शोधणं. 

मल्टी-लेयर संरक्षण : सॉफ्ट-किल तंत्रज्ञानासह हार्ड-किल मायक्रो-क्षेपणास्त्र वापर.

भार्गवास्त्र ड्रोनच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी वापरलं जातं, विशेषत: एकाच वेळी जेव्हा अनेक ड्रोनद्वारे हल्ला केला जातो, हा हल्ला सक्षमपणे परतवण्यासाठी भार्गवास्त्रचा प्रभावी वापर होऊ शकतो. त्यामुळे भार्गवास्त्र हे हवाई संरक्षणासाठी एक महत्त्वाचं शस्त्र ठरणार आहे. त्याचबरोबर भार्गवास्त्र हे शत्रूंच्या ड्रोनचा कर्दनकाळ ठरणार आहे. 


Post a Comment

0 Comments