लोकनेते रामशेठ ठाकुरांचा सल्ला
पनवेल - काम करणाऱ्याला संधी मिळते आणि जे काम करतील तेच पुढे जातील, असं भाजपाचे ज्येष्ठे नेते आणि माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. प्रीतम म्हात्रे आणि जे. एम. म्हात्रे हे समाजकारण करत आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना नक्की न्याय मिळेल, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भाजपाचे प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन झाले. प्रीतम म्हात्रे यांचे जनसंर्पक कार्यालय हे विश्राळी नाका, गुरुशरणम इमारत, पनवेल येथे सुरू करण्यात आले.
जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी,आमदार विक्रांत पाटील, नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अतुल दि. बा. पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर,माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक गणेश कडू यांच्यासह नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या जनसंपर्क कार्यालयात उरण, रायगड, पनवेल या ठिकाणांहून लोक आले तरी त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार, त्यांच्या समस्या जाणून घेणार, इतकेच नव्हे तर कार्यालयातही सन्मानाने वागणूक देणार, अशी माहिती माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिली. त्याचबरोबर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचेच 78 नगरसेवक निवडून आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले.
.png)
0 Comments