Header Ads Widget

KAJAL AGRAWAL : मंदोदरीच्या भूमिकेत काजल तर सनी साकारणार हनुमान


रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका अजरामर केली होती.  तर आता नितेश तिवारींच्या रामायणात मंदोदरीच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल झळकणार आहे. काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेला किती न्याय देते, हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आता नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात झळकणार आहे. काजल अग्रवाल रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारत आहे. तर रावणाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार यशची निवड करण्यात आलीय.  

रामायणात मंदोदरी हे एक महत्त्वाचं पात्र आहे. रामायणातील मंदोदरीची भूमिका साकारणंही तितकंच अवघड आहे. त्यासाठी निर्मात्यांना एक चांगली अभिनेत्री हवी होती. याच पार्श्वभूमीवर काजल अग्रवालची निवड करण्यात आलीय. काजलचे खूप चाहते आहेत. याचाही फायदा रामायण सिनेमाला होऊ शकतो. 

रामायण हा सिनेमा दोन भागांमध्ये बनवला जातोय. त्यातला पहिला भाग दिवाळी 2026 ला आणि दुसरा भाग दिवाळी 2027ला प्रदर्शित होणार आहेत. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीची निवड करण्यात आलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. 

Post a Comment

0 Comments