पावसाळा आला की मन प्रसन्न होतं. उकाड्यातून सुटका होते. मात्र दुसरीकडे जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे पावसाळ्यात मोबाईल कसा सांभाळायचा ? तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पावसाळ्यात मोबाईल कसा सुरक्षित ठेवाल याची महत्त्वाची माहिती. पावसाळा आला की मन कसं ताज, टवटवीत होतं. रिमझिम पाऊस आणि हलकासा वारा...मन उडू उडू लागतं. मात्र थुईथुई नाचणारं मन भलतीच काळजी करतं आणि ही काळजी असते पावसात मोबाईल भिजला तर काय करायचं याची. एकदा तुमचा मोबाईल पावसात भिजला की तो बंद पडू शकतो. निकामी होऊ शकतो.
पावसात मोबाईलमध्ये पाणी जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्क्रीन डॅमेज होणं, स्पीकर काम न करणं, कीपॅड निकामी होणं असा समस्या मोबाईलमध्ये निर्माण होऊ शकतात.
तुम्ही कितीही काळजी घेतलीत तरी कधी ना कधी मोबाईल हा भिजतोच. त्यामुळे मोबाईल ओला झाला तर लगेचच बंद करा. रुमाल किंवा टॉवेलने स्वच्छ करा. थोडा वेळ बंद ठेवा. मोबाईल भिजल्यानंतर लगेचच चालू केलात तर इंटरनल सर्किट होण्याची शक्यता असते.
मोबाईल सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वाच्या टीप्स
वॉटरप्रूफ पाऊच वापरा
मोबाईल बॅगमध्ये ठेवा
मोबाईल मागच्या खिशात ठेवू नका
सिलिका जेल बरोबर ठेवा
मोबाईल वॉटर रेसिस्टंट आहे का ते तपासा
थोडी खबरदारी घेतली, तर तुमचा मोबाईल पावसाळ्यातही सुरक्षित राहू शकतो. शेवटी मोबाईल हे केवळ संपर्काचं नाही, तर आपलं जग आहे. नित्याची गरज आहे. इतकंच नव्हे तर मोबाईल म्हणजे डिजिटल बँक, ऑफिस आणि आठवणींचं डिव्हाईस आहे. तेव्हा योग्य ती काळजी घ्या आणि मोबाईल सांभाळा.
.png)
0 Comments