Header Ads Widget

uday samant janta darbar : दरबार भरला, प्रश्न सुटला


दर महिन्याला भरणार जनता दरबार

रत्नागिरी - ठाण्यामध्ये दरबारावरून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात कलगीतुरा रंगलेला असतानाच रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार सुरू केला आहे. या जनता दरबाराला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

कर्ज मिळत नाही तर येथे संवाद साधा

जनता दरबारामुळे थेट जनतेचे प्रश्न जाणून घेता येतात. लोकांनाही नेत्यांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळते. रत्नागिरीतील समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबाराचे आयोजन केले. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जनता दरबार असणार आहे. पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लोकांचे प्रश्न सोडवत आहेत.

आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला भेट द्या

न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल

आडिवरे टाइम्स फेसबुक पेज

जनता दरबाराला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे मुंबईप्रमाणे आता उदय सामंत दर महिन्याला जनता दरबार घेणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले आहे. 



Post a Comment

0 Comments