महाराष्ट्राच्या विरोधात का होताहेत निर्णय ?
विशेष प्रतिनिधी
मुंबई - राज्यात हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करतानाच महाराष्ट्रात संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने शालेय शिक्षण पद्धतीत 2025 -26 पासून शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला, मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र आहे.
सहजरीत्या लोन होईल उपलब्ध येथे भेट द्या-
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, नव्या अभ्यासक्रमात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी आणि हिंदी हे तिन्ही विषय अनिवार्य करण्यात आले आहेच. यापूर्वी राज्य सरकारने मराठी विषय सक्तीचा केला होता. मात्र आता सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्यात येणार आहेत आणि तसे धोरण राज्य सरकारकडून लागू करण्यात आले आहे.
आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला भेट द्या
खपवून घेणार नाही, संघर्ष अटळ - राज ठाकरे
पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. हिंदीची सक्ती मनसे खपवून घेणार नाही. मेल्याचे दुख नाही मात्र काल सोकावत आहे', अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल - अवश्य पाहा
हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका, असेही राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले. या देशात भाषावार प्रांतरचना झाली आहे, मात्र आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.
'सरकारचा डाव, राजकीय पोळी'राज्य सरकारने हिंदी भाषा अनिवार्य करून राजकीय डाव साधणार असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केलीय. राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्याकडे पाहिले तर लक्षात येते की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे, असे काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन
लोकांनी हिंदी भाषाही शिकली पाहिजे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचे समर्थन केले आहे. 'महाराष्ट्रात मराठी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे. तसेच देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिदी भाषेचा पर्याय आहे. संपर्क सूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिदी भाषा शिकली पाहिजे.' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
.png)
.png)
0 Comments