Header Ads Widget

kunbi chashak : कुणबी चषकावर कोरलं थारळवाडीने नाव


गतविजेते कांगापूर ठरले उपविजेते


श्री कातळेश्वर दुर्गवाडी कशेळीने जिंकलं तृतीय पारितोषिक

मुंबई - कुणबी समाजोन्नती संघ आडिवरे-कशेळी-गावखडीने यंदाही कुणबी विद्यार्थी मित्र चषकाचे आयोजन केले होते. यंदाचा कुणबी विद्यार्थी मित्र चषक जिंकत थारळवाडीने आपले नाव कोरले तर गेल्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावलेल्या कांगापूर संघाला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले. तर श्री कातळेश्वर दुर्गवाडी कशेळी संघाने जिगरबाज खेळी करत तृतीय क्रमांक पटकावला.

कर्ज हवंय. टेन्शन नको तर भेट द्या

मुंबईनजीक असलेल्या नायगावमध्ये कुणबी विद्यार्थी मित्र चषक 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 24 संघांनी भाग घेतला होता. सकाळपासून सुरू झालेले अनेक सामने हे चुरशीचे झाले. अगदी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. चौकार आणि षटकारांची आतषबाजीही पाहायला मिळाली. चौकार, षटकार आणि विकेट गेल्यावर प्रेक्षकांकडून ओरडून ओरडून प्रतिसाद देत होते. 


आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला भेट द्या



कांगापूर, थारळवाडी आणि श्री कातळेश्वर दुर्गवाडी हे तिन्ही संघ फायनलला पोहोचले होते. त्यानंतर या तिन्ही संघांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. थारळवाडी आणि कांगापूर यांच्यातील अंतिम सामना हा रोमहर्षक झाला. यंदा कुणबी विद्यार्थी मित्र चषक कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. क्षणक्षणाला विजयाचा पारडा फिरत होता. शेवटी थारळवाडीने एका धावाने कांगापूर संघावर मात करत विजय मिळवला आणि कुणबी विद्यार्थी मित्र चषक पटकावला. कुणबी समाजोन्नती संघाकडून सहभागी झालेल्या सर्व संघांना सन्मानचिन्ह देत त्यांचाही सन्मान केला.
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल

कुणबी विद्यार्थी मित्र चषक 2025चं आयोजन आणि नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या वेळी आडिवरे - कशेळी - गावखडी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष प्रभाकर वारीक, माजी संचालक अरविंद डाफळे, श्री महाकाली इंग्लीश स्कूल आडिवरे आणि सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक पुंडपाळ सर आणि संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 



Post a Comment

1 Comments

  1. 🏆सर्व विजयी संघांचे हार्दिक अभिनंदन💐

    ReplyDelete