नदीत बुडून नववीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
संदीप शेमणकर
राजापूर - गंधार अमित पळसुलेदेसाई. अवघ्या 15 वर्षांचा नववीत शिकणारा विद्यार्थी. जिजामाता विद्यामंदिरचा तो विद्यार्थी. परीक्षेचा पेपर दिला आणि नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला. मात्र दगडावरून त्याचा पाय घसरला आणि नदीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला भेट द्या
गंधार हा गुरुवारी दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी पेपर सुटल्यानंतर गावच्या मांडावर खेळायला गेला. खेळून झाल्यावर तो मित्रांसोबत जवळच असलेल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला. मात्र पाय घसरल्याने तो नदीत पडला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. गंधारला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. ग्रामीण रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले.
या घटनेने गंधार यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तसेच रायपाटण बागवाडीवर शोककळा पसरली. त्याला आई, मोठा भाऊ,आजी आजोबा आणि परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

.png)
0 Comments