Header Ads Widget

UDAY SAMANT ON RAJAN SALVI : संकुचित वृत्तीमुळे विकास रखडला - उदय सामंत


UDAY SAMANT ON RAJAN SALVI : संकुचित वृत्तीमुळे विकास रखडला - उदय सामंत

नाव न घेता राजन साळवी यांच्यावर टीका

विशेष प्रतिनिधी

राजापूर - संकुचित वृत्तीच्या लोकप्रतिनिधींमुळे राजापूर तालुक्याचा विकास होऊ शकला नाही. गेली दहा वर्षे विकासकामांना गती मिळालेली नाही. त्यामुळे आता राजापूर, लांजा तालुक्यांकडे लक्ष देत आहोत असे म्हणत उद्योगमंत्री आणि रत्नागिरी  जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यावर टीका केली. राजापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

राजापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेमुळे राजापूरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल आणि भविष्यात राजापूरवासीयांना चौवीस तास पाणी उपलब्ध होऊ शकेल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या कॅशलेस हॉस्पिटलमप्रमाणे राजापुरातही कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येईल, अशी घोषणाही उदय सामंत यांनी यावेळी केली. राजापूर आणि लांजा या दोन्ही तालुक्यांचा विकास झपाट्याने केला जाईल, असे आश्वासनही उदय सामंत यांनी दिले. 

नाव न घेता राजन साळवींवर टीका

'खोटे बोला, मात्र रेटून बोला आणि बॅनरबाजी करून फुकटेचे श्रेय लाटा यात महाराष्ट्रात जर नंबर काढायचा असेल तर राजापूरच्या लोकप्रतिनिधींचा नंबर येईल,' अशी बोचरी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे नाव न घेता केली.  खोटी बॅनरबाजी करून श्रेय मिळत नाही तर त्यासाठी फिल्डवर उतरून काम करावे लागते, असा टोलाही उदय सामंत यांनी लगावला. 

राजापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे तसेच कोदवली येथील नवीन धरणाच्या उर्वरीत कामाचे भूमिपूजन  उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे आणि माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी नगराध्यक्ष व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, शहरप्रमुख सौरभ खडपे, प्रांताधिकारी डॉ. जस्मीन, नगरपालिका प्रशासन उपआयुक्त तुषार बाबर, तहसीलदार विकास गंबरे, मुख्याधिकारी चेतन विसपुते, अर्बन बँक उपाध्यक्ष विवेक गादीकर, संचालक संजय ओगले, महिला आघाडी तालुकाप्रमुख डबरे, हर्षदा खानविलकर, नगरपालिकेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments