konkan : शहरात कोकणी...कोकणात नेपाळी, कुठे नेऊन ठेवलाय कोकण माझा ?
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने !कोकणातील राजकारण ! निवडणुका !
संजय यादवराव
महाराष्ट्रात सर्वाधिक विकासाची क्षमता कोकण प्रदेशात आहे. आज घडीला कोकणची अर्थव्यवस्था ही पश्चिम बंगाल किंवा राजस्थान या राज्यापेक्षा मोठी आहे. जर नीट नियोजन केलं तर उर्वरित महाराष्ट्राच्या दुप्पट आर्थिक ताकद एकट्या कोकण प्रदेशात निर्माण होऊ शकते. पण गेली 77 वर्ष जाणीवपूर्वक या प्रदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
गेली 77 वर्ष कोकणातील राजकारण एका विशिष्ट पद्धतीने सुरू आहे. इतकी वर्ष झाली कोकणातला माणूस आपल्या गावासाठी रस्ता, पायवाटा, पिण्याचे पाणी मागतोय. साध्या मूलभूत सोयी इथल्या गावांना मिळाल्या नाहीत. आजही अनेक गावे आहेत ज्या गावांमध्ये मातीचे रस्ते आहेत किंवा रस्तेच नाहीत. आमच्या मागण्यासुद्धा गेली 77 वर्षे वाडीला रस्ता द्या, पायवाट किंवा पाखाडी द्या, एसटीची शेड, समाजमंदिर, जमलं तर देवळासाठी मदत, पाच-दहा वर्षांत बंद पडणारी भ्रष्टाचारी नळपणी योजना इतक्यापुरत्याच राहिल्या.
राज्यकर्त्यांनीसुद्धा दर निवडणुकीच्या वेळी आम्हाला हीच आश्वासने दिली. जमेल तितकी कामे केली. आम्ही जे मागितले ते आम्हाला मिळाले. आम्ही चांगले शिक्षण, चांगल्या आरोग्याच्या सुविधा, आमच्या गावाला रोजगार देतील, असे उद्योगांचे प्रकल्प कधी मागितलेच नाहीत.
पैशांची गरज आहे तर येथे भेट द्या
अर्थात ही विकासाची कामे करताना इथल्या गावकऱ्यांना सुविधा होईल हा दृष्टिकोन बाजूला ठेवून या कामातून मला किती कमिशन मिळेल, हा दृष्टिकोन मागच्या वीस - पंचवीस वर्षात खूप जोराने विकसित झाला. पूर्वी काही लोक पैसे खात होते, आता गाव पातळीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद अगदी वरपर्यंत विकासकामामधून कमिशन मिळवण्याची पद्धत सुरू झाली. अनेकांना तो आपला हक्काचा विषय आहे असे वाटू लागले. त्यामुळे एक वर्षात उखडणारे रस्ते, पूर्वीची दुर्गम वाट बरी होती अशा दर्जाच्या पाखाड्या आणि पाणी नसलेले फुटके नळ अशी आमच्या गावाच्या विकासाची दुर्दशा झाली. गावातल्या शासकीय इमारतींची अवस्था काय आहे ?
बरं कोणताही कोकणातला पुढारी कोकणामध्ये गावागावांमध्ये रोजगार निर्माण होईल यासाठी काम करत नाही. गावात रोजगार म्हणजे दोन-तीन मुलांना कॉन्ट्रॅक्टर बनवणे, त्यातून कमिशनखोरी करणे आणि गावाची वाताहत करणे. आज कोणत्याही गावांमध्ये स्थानिक रोजगार नाही, पर्यटन, शेती, मत्स्यउद्योग प्रक्रिया, ग्रामीण उद्योग, प्रचंड संधी आहेत; परंतु यावर काम करताना कोणताच पुढारी दिसत नाही. कोकणातल्या नोकऱ्या कोकणातील तरुणांना मिळत नाहीत. एक विशिष्ट लॉबी पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातून कार्यरत आहे. तिथल्या तरुणांसाठी कोकणात नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. कोकणात 90 टक्के अधिकारी हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील आहेत आणि त्यामुळे मातीशी कनेक्ट नसलेले हे अधिकारी शासनाच्या कोणत्याही योजना प्रभावीपणे कोकणात राबवत नाहीत.
कर्ज मिळत नाही, येथे प्रयत्न करा, नक्की काम होईल
बँका कर्ज देत नाहीत. सरकारी अधिकारी परवानगी देत नाही आणि सबसिडी देत नाहीत. त्यामुळे कोकणात ग्रामीण उद्योग उभे राहण्याचा प्रश्नच नाही. जे या दृष्टीने प्रयत्न करतात त्यांना त्रास कसा होईल, याची काळजी सगळे मिळून घेतात.
या सर्वांच्या जोडीला आता कोकणात प्रत्येक गावात हजारो माकड, वानर, रानडुकरे आणि आता गवे आले आहेत. त्यामुळे भातशेती, नाचणी, वरी, भाजीपाला, कुळीथ, पावटा कुठलीच शेती करता येत नाही. 90 टक्के कोकणातील शेती बंद आहे. समुद्रकिनाऱ्यावर कोस्टल भागात असलेली गावे कधी काळी श्रीमंत आणि समृद्ध होती. आता माकडे पालवी खातात. मोहर खातात. आंबे पाडतात. फांद्या तोडतात. त्यांच्या रक्षणासाठी लाखो नेपाळी आणावे लागतात. ते हापूस आंब्याचे प्रॉफिट घेऊन जातात. हापूस आंब्याची वाताहात, आता काजूची बोंडे तोडायला लागली, फणसाची कुयरी खातात, बांबूचे कोंब तोडतात, कोणतीच शेती करायची सोय राहिली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये कोकणातला आमचा शेतकरी हातबल झाला आहे. रोजगार नसल्यामुळे सालाबादप्रमाणे इथले तरुण आणि तरुणी मुंबई, पुण्यात जाऊन झोपडपट्टींमध्ये राहात आहेत.
घरासाठी कर्ज मिळत नाही, अवश्य भेट द्या
दुर्दैवाने कोकण रिकामे होत आहे. गावांची लोकसंख्या 80 टक्के कमी झाली. गावातील 50 टक्के घरे बंद झाली आहेत. एकेकाळी शाळेत 100 / 200 मुले होती. आज दोन आणि पाच मुले आहेत. वृद्ध झालेली आमची गावे, हतबल आणि निराश आहेत. त्यातच आमचे पुढारी या गावासाठी एक कोटी, त्या गावासाठी पाच कोटी, 25 कोटीचा सिमेंटचा रस्ता, शंभर कोटीचे धरण अशी कोटीच्या कोटी विकासाची उड्डाणे करत आहेत. गावांचे वृद्धाश्रम झाले, शाळेत जायला मुले नाहीत. शाळा बंद पडल्. या गावात तरुण नाहीत. शेती 90 टक्के बंद झाली. सोन्यासारखी निसर्गसमृद्ध आमची गावे भकास आणि उदास दिसू लागली. आणि सर्वच जण म्हणतात की 'आम्ही कोकणचा कायपालट केला'.
मित्रांनो, आपल्यासहित आपल्या सर्वांना याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. पाखाडी, साकव, रस्ते यापलीकडे विकास असतो हे समजून घेणे आवश्यक आहे. कोकणात गावागावांत रोजगार आणि उद्योग उभारले जावेत. ते स्थानिक माणसाने करावेत. यासाठी केवळ सरकारकडे आग्रह नाही तर आपण सर्वांनी काम करणे आवश्यक आहे.
साईड इन्कम हवी आहे, मग थांबलात का ?
नीट नियोजन केले तर आपली गावे, आपली पंचक्रोशी, आपला तालुका समृद्ध होईल हे नक्की, पण त्यासाठी एका बाजूने सरकारकडे आग्रह, चांगले पुढारी निवडून देणे आणि दुसऱ्या बाजूने रोजगार आणि उद्योग निर्मितीसाठी एक लोकचळवळ आवश्यक आहे. यासाठी शिवस्वराज्य अभियान लोक चळवळ मी सुरू करत आहे. संपूर्ण कोकणात 3000 गावांमध्ये पुढच्या हजार दिवसात जाऊन या अभियानासाठी प्रत्येक गावात दहा तरुणांची टीम उभी करण्याचा संकल्प मी केला आहे.
या संकल्पची सुरुवात आम्ही राजापूर, लांजा, साखरपा, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव तळा या तालुक्यांतून करत आहोत. हे काम पुढे नेण्याच्या दृष्टीने कोकणामध्ये लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत. शासकीय यंत्रणा आणि सहकार्य न करणारे अधिकारी यांना सरळ करणे आवश्यक आहे आणि यासाठी मी स्वतः राजापूर लांजा साखरपा आणि दुसरा उमेदवार श्रीवर्धन म्हसळा तळा माणगाव या दोन विधानसभेतून उभे राहत आहोत. यासाठी समृद्ध कोकण संघटना ही कोकणाचे स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले आहे. स्वतंत्र कोकण नको, पण स्वायत्त कोकण पाहिजे. दुसऱ्याच्या हक्काचे नको, पण आमच्या हक्काचे यापुढे कोकणाला मिळालेच पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि त्यासाठी स्वायत्त कोकण समितीची निर्मिती केली आहे. कोकणाच्या मूलभूत समस्यांवर काम करणारे आमदार पुढच्या काळामध्ये विधानसभेमध्ये निवडून जायला हवेत, यादृष्टीने एक पर्याय आम्ही कोकणातला जनतेला उपलब्ध करून देत आहोत.
तुम्ही कमवा, दुसऱ्याला कमवू द्या
नेहमीचा भुलभुलय्या, भुलथापा, पैशांचे वाटप यातून निवडणुका होणार असतील तर जे गावांमध्ये चित्र दिसत आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात घडणार आहे. आज गावांची ही स्थिती काय आहे, पुढे काय घडेल, याची आपण कल्पना करा.
गेली पंचवीस वर्षं मी या विषयाबाबत काम करत आहे आणि आता आक्रमकपणे हे प्रत्यक्ष घडावे यासाठी ग्रामीण पातळीवर काम सुरू करत आहे. नेहमीची उदासीनता बाजूला करून शेतकऱ्यांचे, तरुणांचे, बागायतदारांचे, मुंबई, पुणेकर चाकरमानी यांचे ,आपल्या सर्वांचे पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
संजय यादवराव
विधानसभा निवडणूक उमेदवार
राजापूर लांजा साखरपा मतदार संघ
इफ्तिकार चरफरे
विधानसभा निवडणूक उमेदवार
श्रीवर्धन म्हसळा तळा माणगाव मतदार संघ
शिवस्वराज्य अभियान
स्वायत्त कोकण समिती
समृद्ध कोकण संघटना
आम्ही सुरुवात केली आहे आपण सहभागी व्हा ! ज्यांना या निवडणुकीत आम्हाला सहकार्य करायचे आहे त्यांनी आपली नाव नंबर द्या.
संपर्क विजय. +91 87798 42009
0 Comments