RAJAPUR SINDE VS THACKERAY : राजापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार
प्रकाश कुवळेकरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन सोडले
ठाकरेंच्या शिवसेनेसमोर राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात आव्हान
विशेष प्रतिनिधी
राजापूर - विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राजापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकरांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजापूर तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेसमोर शिंदेंच्या शिवसेनेने मोठे आव्हान निर्माण केले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पैशांची गरज आहे तर येथे काम होईल
राजापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नसिंधू समृद्ध समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजन कुवळेकर, जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
व्यावसायासाठी पैसा हवा आहे तर येथे संपर्क करा
उदय सामंतांचा शब्द
शिंदेंच्या शिवसेनेत सर्वांना मानाचे स्थान दिले जाईल, असा विश्वास आणि शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. या पक्ष प्रवेशानंतर प्रकाश कुवळेकर यांच्याकडे जिल्हा संघटक म्हणून तर अन्य काहींची संघटनात्मकपदी नियुक्ती करण्यात आली. राजापूर शहरातील आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या पक्ष प्रवेशावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग
गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडले जात आहे. राजापूर, लांजा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
.png)
0 Comments