श्री महाकाली रंगमंचावर रंगलं माऊली महिला नमन
संदीप शेमणकर
आडिवरे - श्री महाकाली देवीचा नवरात्रोत्सव हा अतिशय प्रसिद्ध. याच देवीच्या रंगमंचावर अनेक दशवतार झाले आहेत. अनेक नाटकांचे सादरीकरण झाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत. यंदा श्री महाकाली मंदिर देवस्थान रंगमंचावर प्रथमच माऊली महिला नमन मंडळाने उत्तम सादरीकरण करून रसिकप्रेक्षकांची मने जिंकली.
पैशांचा अडचण आहे, येथे भेट द्या
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार संस्था संचालित माऊली नमन महिला नमन मंडळाचे महिलांचे पहिलेच नमन पाहताना सर्वांनी उत्सुकता होती.
या नमनातील कलाकार हे अगदी १२ वर्षांपासून ते ८० वर्षापर्यत या नमनात महिलांचा सहभाग होता. या सर्वांनी उत्तम अभिनय करत रंगमंच गाजवला.
लेखक, दिग्दर्शक नमनसम्राट यशवंत वाकडे यांनी या नमनासाठी प्रचंड मेहनत घेतली. जिल्ह्यातील महिलांच्या नमनाचा पहिला प्रयोग सादरीकरणाचे फार मोठे साहस केले. कॉश्युम, प्रॉपर्टी, योग्य रीतीने केलेली मांडणी फार सुंदर होती. सर्व कलाकारांचा अभिनय वाखाणण्यासारखा होता. त्यामुळे माऊली नमन मंडळाने सादर केलेला आभार संस्थेच्या अष्टपैलू समाजकार्यात हा महिलांनी सादर केलेला प्रयोग म्हणजे एक मानाचा तुराच होता.
या प्रयोगात प्रेरणा वीलणकर, वेदा शेट्ये, सर्वता चव्हाण, रिमा देसाई, पूनम गोळपकर, शीतल सकपाळ, विनया काळप, रेश्मा शिंदे, समीक्षा वालम, तन्वी नागवेकर, माधवी पाटील,आकांक्षा वायंगणकर, अर्चना मयेकर, ज्योती कदम, गीता भागवत, रेश्मा खातू, पूर्वा चव्हाण या कलाकारांनी सहभाग घेऊन उत्तम कला सादर केली. निर्माता साईनाथ नागवेकर, सूत्रधार वासुदेव वाघे,सागर मायंगडे या नमन मंडळाला दादा वाडेकर, शरद गोळपकर,राकेश बेर्डे, संजय मेस्त्री, मदन डोर्लेकर गुरुजी, मानसी साळवी यांचे विशेष सहाय्य लाभले होते.
संगीतसाथ प्रवीण सावंतदेसाई, परशुराम घवाळी, ओमकार मांडवकर, पार्तेज आंबेरकर यांची तर नेपथ्य व्यवस्थापक संतोष ऊर्फ बावा आग्रे यांनी घेतलेली मेहनत वाखाण्यासारखीच होती.
0 Comments