Header Ads Widget

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका


विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

नाटे बांदकरवाडी येथील घटना

संदीप शेमणकर

राजापूर - राजापूर तालुक्यातील नाटे बांधकरवाडी येथे पहाटे पाच वाजताच्या सुमारास सुरेश स्थळेश्री यांच्या बागेतील विहिरीत बिबट्या पडला होता.याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. वनविभाग आणि ग्रामस्थांनी बिबट्याची सुखरूप सुटका केली. 

येथे भेट द्या, स्वप्न पूर्ण करा

बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सकाळी आठच्या सुमारास पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.तोपर्यंत ग्रामस्थांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. पहिल्या वेळी बिबट्याने पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी तोडल्याने पिंजऱ्याचा दरवाजा विहिरीत पडला. यादरम्यान बिबट्या पिंजऱ्यावर चढून वरती उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण विहिरीला वरून जाळी लावण्यात आली होती.

कुठेही कर्ज मिळत नाही, मग येथे भेट द्या

ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यात पडलेला दरवाजा बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा पिंजरा पाण्यात सोडण्यात आला. अनेक प्रयत्नांनंतर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर  त्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले.बिबट्याला पिंजऱ्यातून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


Post a Comment

0 Comments